IMPIMP

Maharashtra Election Commission | ‘मतदार नाव नोंदणीसाठी 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ’

by nagesh
Five State Assembly Election-2022 | assembly election 2022 live updates uttar pradesh punjab goa manipur uttarakhand bjp congress pm security breach reactions

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  – Maharashtra Election Commission | भारत निवडणूक आयोगामार्फत 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम (Brief review program) राबविण्यात आला आहे. त्या माध्यमातून दिनांक 5 जानेवारी 2022 रोजी विधानसभा मतदारसंघांच्या अंतिम मतदार याद्या जारी करण्यात येणार आहे. या पार्श्वभुमीवर आता विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा कालावधी वाढविण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local body elections) आगामी निवडणुकांच्या (Maharashtra Election Commission) अनुषंगाने दिनांक 5 डिसेंबर 2021 पर्यंत पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदवता येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान (U.P. S. Madan) यांनी आज दिली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

आगामी निवडणुकांची मोठी आकडेवारी लक्षात घेवून संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमास मुदतवाढ देण्याबाबत मागणी करण्यात आली होती. राज्य मुख्य निवडणूक (Maharashtra Election Commission) अधिकाऱ्यांद्वारे मुदतवाढ देण्याबाबत भारत निवडणूक आयोगाकडे (Election Commission of India) मागणी केली होती. या पार्श्वभुमीवर या पुनरीक्षण कार्यक्रमास 5 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. यामुळे आता पुन्हा 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांना 5 डिसेंबर 2021 पर्यंत मतदार यादीत नावे नोंदविण्याची संधी प्राप्त करण्यात आली आहे. (Maharashtra Election Commission)

मतदार नोंदणीसाठी –

राज्य निवडणूक आयोग (Maharashtra Election Commission) आणि गपशप संस्थेने मतदार नोंदणीची सुविधा आणि त्याबाबत संपूर्ण माहिती ‘महाव्होटर चॅटबॉट’या (Mahavoter Chatbot) अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलीय. या पार्श्वभुमीवर http://bit.ly/mahavoter या लिंकवर क्लिक करून अथवा +917669300321 या व्हॉट्सॲप क्रमांकावर hi करून माहिती मिळवू शकणार आहात. अथवा https://mahavoter.in या संकेत स्थळालाही भेट देऊ शकणार आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title : Maharashtra Election Commission | extension till 5th december for voter registration information of state election commissioner

हे देखील वाचा :

Kalicharan Maharaj | ‘कोरोनाच्या नावाखाली लोक मारले, कोरोना व जागतिक आरोग्य संघटना बोगस’, कालीपूर कालीचरण महाराजांची मुक्ताफळे

Akshara Singh | समुद्र किनारी अक्षरा सिंहने दिल्या बोल्ड पोज, लोकं म्हणाले…

Dormant Bank Accounts | बँकांच्या निष्क्रिय खात्यांमध्ये पडले आहेत 26,697 कोटी रुपये, जाणून घ्या कसा करावा क्लेम

Related Posts