IMPIMP

Anil Deshmukh | 100 कोटींचे वसुली प्रकरण : अनिल देशमुख यांच्या 2 स्वीय सहाय्यकांना अटक

by bali123
maharashtra ex home minister anil deshmukhs difficulty increases pa sanjeev palande and kundan shinde arrested

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Anil Deshmukh |100 कोटींचे वसुली प्रकरणी (100 crore recovery case) ईडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांच्या 2 स्वीय सहाय्यकांना अटक (ed raid and arrest) केली आहे. शुक्रवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आल्याचे बातमीमध्ये सांगण्यात आले आहे. maharashtra ex home minister anil deshmukhs difficulty increases pa sanjeev palande and kundan shinde arrested

संजीव पालांडे (sanjeev palande) आणि कुंदन शिंदे (kundan shinde) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) शुक्रवारी वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. तर ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील 10 ते 12 बार मालकांचे जबाब नोंदवले आहेत. या बार मालकांनी आपण हप्ता दिल्याची कबुली ईडीच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. 10 ते 12 मालकांनी मिळून काही महिने तब्बल 4 कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली दिलीय. बार मालकाच्या जबाबानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांकडून अन्य ठिकाणीही शुक्रवारी दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई सुरू होती.

तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी एका पत्रातून अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर शंभर कोटी रुपयांचा खंडणीचा आरोप केला होता. तर ईडीच्या पथकाकडून जी कारवाई सुरू आहे त्यावरुन अनिल देशमुख (Anil Deshmukh)यांच्या अडचणीत वाढ होत असल्याचं दिसत आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

या दरम्यान, अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे हे ईडीच्या कार्यालयात दाखल झाले होते. पलांडे त्यांची चौकशी सुरू करण्यात आली.
परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी लेटर बॉम्ब टाकत अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुली करण्याचा आरोप केला होता.

तसेच, या संपूर्ण प्रकरणात संजीव पलांडे (sanjeev palande) यांच्या नाव देखील नमूद करण्यात आलं होतं.
त्यानंतर ईडीने शुक्रवारी मध्य रात्री संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे (kundan shinde) यांना अटक केली आहे.

Web Titel : maharashtra ex home minister anil deshmukhs difficulty increases pa sanjeev palande and kundan shinde arrested

Related Posts