IMPIMP

Maharashtra Government | ठाकरे सरकारचा निर्णय ! मोकळ्या जागेत सांस्कृतिक कार्यक्रमास परवानगी

by nagesh
CM Uddhav Thackeray | cm uddhav thackeray electric st bus shivai msrtc bus pune to ahmednagar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  Maharashtra Government | गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या महामारीमुळे अनेक नाट्यकला, चित्रपटगृहे बरोबरच लोककलाही सादर करता आल्या नाहीत. सध्या कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्याने चित्रपटगृहे खुली करण्यास राज्य सरकारने परवानगी दिलीय. मात्र मोकळ्या जागेत सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी नव्हती. आता लोककलाकारांना आपल्या लोककला सादर करता येणार आहेत. सरकारकडून (Maharashtra Government) सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी मिळाल्याने शाहिरीपासून ते तमाशांचे कार्यक्रमाला जोर लागणार आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

राज्य सरकारने (Maharashtra Government) आज एक पत्रक जारी केले आहे. कोरोनामुळे तमाशा, शाहिरी, भारुड या लोककलांना कार्यक्रम सादर करण्यास परवानगी नव्हती.
आपल्यालाही सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी तमाशा लोककलावंत परिषदेने शासनाकडे केली होती.
या अनुषंगाने बंदीस्त सभागृहे आणि मोकळ्या मैदानात सर्व सांस्कृतिक कार्यक्रम व लोककला सादर करण्यास राज्य सरकारने परवानगी दिलीय. याबाबत आदेश देखील जारी केले आहे.

राज्य सरकारकडून तमाशा, दशावतार, भारुड, शाहिरी इत्यादी कार्यक्रमासह टुरिंग टॉकिजला परवानगी देण्यात आली आहे.
तसेच या सर्वांना कोरोनाच्या अटींचे पालन करण्याचे बंधन देखील घालण्यात आलं आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे तमाशा कलावंताना मोठा दिलासा मिळाला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

दरम्यान, कोरोनामुळे लॉकडाऊन लागल्याने या लोककला कलावंतांवर उपासमारीची वेळ आली होती.
कार्यक्रम बंद झाले आणि उत्पन्नाचं काहीच साधन नाही अशी अवस्था या कलावंतांवर ओढवली होती.
यामुळे या कलावंतांनी शासनाकडून मदत मिळावी म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह काही मंत्र्यांची देखील भेट घेतली होती.
दरम्यान, त्यावेळी सरकारला कलावंतांना मदत करण्याचे आवाहनही पवारांनी दिले होते.

Web Title : Maharashtra Government | maharashtra government relief covid rules for cultural program in open space

हे देखील वाचा :

Parambir Singh | फरार मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह भारतातच, ‘या’ ठिकाणी आहेत मुंबईचे माजी पोलिस आयुक्त

Maharashtra Cabinet Reshuffle | अधिवेशनापुर्वी मंत्रिमंडळात फेरबदल?; काँग्रेसचे दोन मंत्री बदलणार तर, ‘या’ चेहर्‍यांना संधी

Pune Crime | चोरट्यांचा भरदिवसा महिलेच्या दागिन्यांवर डल्ला, पुण्यातील घटना

Related Posts