IMPIMP

Maharashtra Govt Decision To Stop Widow Practice | विधवा प्रथा हद्दपार ! हेरवाड गावच्या ऐतिहासिक ठरावाचे शासन निर्णयात रुपांतर

by nagesh
Maharashtra Govt Decision To Stop Widow Practice | attention of herwadkar village government of maharashtra decision to stop widow practice

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Maharashtra Govt Decision To Stop Widow Practice | परंपरेनं चालत आलेले रितीरिवाज सहसा बंद होत नाहीत. त्याला अतिकठीणत-हेने संपुष्ठात आणावे लागतात. कोल्हापूर (Kolhapur News) जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने (Herwad Gram Panchayat) एक ऐतिहासिक निर्णय घेत परंपराच संपुष्ठात आणली आहे. हेरवाड ग्रामपंचायतीने गावातील विधवा प्रथा (Widow Practice) बंद करण्याचा ठराव केला आहे. हा निर्णय घेतल्यानंतर गावकऱ्यांसह सरपंचाचे कोतुक करण्यात आलं आहे. या निर्णयाचं आता शासन निर्णयात (Maharashtra Govt Decision To Stop Widow Practice) रुपांतर केले आहे. या निर्णयामुळे आता पतीच्या निधनानंतर पाळल्या जाणाऱ्या प्रथा बंद होणार आहेत.

आज अधिकतर महाराष्ट्रात पतीच्या निधनानंतर कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे, यासारख्या प्रथांचे पालन केले जाते. या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्धार कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी पल्लवी कोळेकर (Village Development Officer Pallavi Kolekar), सरपंच सुरगोंडा पाटील (Surgonda Patil) आणि ग्रामसभेने घेतला होता. यानंतर राज्य सरकारकडून (Maharashtra State Government) या ठरावासाठी शासन निर्णय घेण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड गावात विधवा प्रथा कायमची बंद करण्यात आली आहे.
पतीच्या निधनानंतर महिलेच्या कपाळावरील कुंकू पुसणे, हातातील बांगड्या फोडणे या प्रथा आता बंद करण्यात आल्यात.
प्रत्येकाला सन्मानाने जगता यावे यासाठी हेरवाड गावाने हा मोठा पुढाकार घेतला आहे.
यासाठी गावाने पुढाकार घेत महिलांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे.

Web Title : Maharashtra Govt Decision To Stop Widow Practice | attention of herwadkar
village government of maharashtra decision to stop widow practice

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Abbott India | 275 रुपयांचा डिव्हिडंट देत आहे ‘ही’ फार्मा कंपनी, 7000% दिला आहे रिटर्न

TTML Share Price | 12 रुपयांवरून वाढून 125 रुपयांच्या पुढे गेला टाटा ग्रुपचा हा शेअर, गुंतवणुकदारांचे 1 लाख झाले 9.78 लाख रुपये

Pune Crime | हडपसरमध्ये गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून जुगार अड्ड्यावर छापा

Rakesh Jhunjhunwala Portfolio Stock | रू. 2900 वर जाईल टाटा ग्रुपचा हा स्टॉक, राकेश झुनझुवाला यांचा आहे फेव्हरेट, आता खरेदी केल्यास मोठा नफा

Sanjay Raut on Nana Patole | ‘मुंबईत काँग्रेसचा महापौर कधी होता, हे नाना पटोले यांना आठवतंय तरी का?’ – संजय राऊत

Related Posts