IMPIMP

Maharashtra Karnataka Border Dispute | मुंबईला केंद्रशासित करा म्हणणाऱ्या कर्नाटकच्या मंत्र्याला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘मुंबई कोणाच्या बापाची…’

by nagesh
Devendra Fadnavis On Mumbai Textile Commissioner Office | No decision to shift textile commissioner's office to Delhi - Devendra Fadnavis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – Maharashtra Karnataka Border Dispute | राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये (Winter Session) काल महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक विरोधातील ठराव एकमाताने मंजूर करण्यात आला. याचे पडसाद काल कर्नाटक विधिमंडळात (Karnataka Legislative Assembly) उमटल्याचे पहायला मिळाले. कर्नाटकचे उच्च शिक्षणमंत्री सी.एन. अश्वथ नारायण (C.N. Ashwath Narayan) यांनी एक वादग्रस्त विधान केलं. मुंबईत 20 टक्के कानडी लोक असल्याचे म्हणत मुंबईला केंद्रशासित (Mumbai Union Territory) करा असे म्हणत त्यांनी महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न केला. यावरुन आता महाराष्ट्रातील नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबई महाराष्ट्राची असून कोणाच्याही बापाची नसल्याचे म्हणत प्रत्युत्तर दिले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केलेला विषय महत्त्वाचा आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांकडे (Union Home Minister) झालेल्या बैठकीत दोन्ही राज्यांनी नव्याने दावे केले जाणार नाहीत हे मान्य केले होते. आपणही काल ठराव करताना सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) जो दावा आहे, त्यानुसारच ठराव केला आहे. त्यामुळे कर्नाटकच्या मंत्र्यांनी किंवा आमदारांनी तसचं काँग्रेस (Congress) अध्यक्षांनी केलेले दावे त्या बैठकीशी विसंगत आहेत, ते पूर्णपणे चुकीचे असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. (Maharashtra Karnataka Border Dispute)

मुंबईवर दावा सांगण खपवून घेणार नाही

मुंबईवर दावा सांगणं खपवून घेतले जाणार नाही. त्या बद्दल आम्ही निषेध करतो.विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे तशा प्रकारचं निषेधाचे पत्र आम्ही त्यांना पाठवू. गृहमंत्र्यांसमोर जे ठरलं आहे त्याचं उल्लंघन करणं दोन राज्यांमधील संबंधांसाठी योग्य नाही. हे त्यांना कडक शब्दात सांगण्यात येईल. तसेच तुमच्यासमोर जे ठरलं होतं त्याचं कर्नाटक पालन करत नसल्याचं गृहमंत्र्यांच्याही निदर्शनास आणून दिले जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई कोणाच्या बापाची नाही

केंद्रीय गृहमंत्र्यांनी कर्नाटकच्या अशा बोलघेवड्या लोकांना तंबी दिली पाहिजे, अशी विनंती करणार आहे.
मी पुन्हा सांगतो की, मुंबई महाराष्ट्राचीच, ती कोणाच्या बापाची नाही,
त्यावरचा कोणाचाही दावा खपवून घेतला जाणार नाही, असं फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Maharashtra Karnataka Border Dispute | maharashtra assembly session bjp devendra fadnavis on karnataka mumbai

हे देखील वाचा :

Nashik Crime | सुसाइड नोटमध्ये भाजप नेत्यांची नावे लिहून एकाची आत्महत्या, दोघांवर FIR

Pune Crime | लिलाव भिशीतून चांगला मोबदला देण्याच्या आमिषाने 70 लाखांची फसवणूक

Ajit Pawar | अजित पवार सरकारी विमानाने तातडीने मुंबईत दाखल, ‘हे’ प्रमुख कारण

Related Posts