IMPIMP

Maharashtra Karnataka Border Dispute | …तोपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा, उद्धव ठाकरेंची अधिवेशनात मागणी

by nagesh
Maharashtra Karnataka Border Dispute | uddhav thackeray declare karnataka occupied maharashtra union territory till court decision uddhav thackeray demand in legislative council

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Karnataka Border Dispute | कर्नाटक हे भारताचं राज्य आहे की नाही? सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) निकाल आम्हाला बंधनकारक मग कर्नाटकाला नाही का? सीमावादावर सर्व पक्ष कर्नाटकात एकत्रित उभे राहतात ते चित्र आपल्याकडे दिसत नाही. आजचे मंत्री कर्नाटकात जन्म घ्यावा असं म्हणतात मग न्यायाची अपेक्षा कुणाकडून करणार? आजच सीमावाद (Maharashtra Karnataka Border Dispute) कसा पेटाल? आपल्या आदर्शाचा अपमान महाराष्ट्रातच व्हायला लागला मग इतर सोडणार कसे? आज नाही तर कधीच नाही या जिद्दीने उभं राहायला हवं. सीमाभाग केंद्रशासित (Union Territory) झाला पाहिजे. कानडींचा अत्याचार थांबलाच पाहिजे. संपूर्ण प्रशासन केंद्र सरकारने (Central Government) हाती घेऊन पालकत्व करावं असा ठराव आजच्या आज झाला पाहिजे अशी मागणी विधान परिषदेत आमदार उद्धव ठाकरे यांनी केली.

आता तुम्ही सीमा ओलांडली

सीमाप्रश्न (Maharashtra Karnataka Border Dispute) हा भाषावार प्रांत रचनेचा विषय नाही. माणुसकीचा हा विषय आहे. खालच्या सभागृहात काहीजण म्हणतात आम्ही लाठ्या काठ्या खाल्ल्या आहेत. त्यावेळी तुम्ही सत्ताधारी पक्षात होता आता तुम्ही सीमा ओलांडली आहे. मुख्यमंत्री दिल्लीत गेले. खरतर हा विषय सुरु असताना दिल्लीला जाणे योग्य आहे का? मुळात गृहमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर यांनी केलं काय? येथे आम्ही कायदा केला की महाराष्ट्रात मराठी पाट्या लागल्या पाहिजेत तर काही जण कोर्टात गेले. मुळात आपलं सरकारं कर्नाटक सरकार (Government of Karnataka) सारखी भुमिका मांडणार आहे का?

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

नुसती बडबड नको

सीमाप्रश्नी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शिंदे-फडणवीस सरकारवर
(Shinde-Fadnavis Government) हल्लाबोल केला. बेळगाव महापालिकेने महाराष्ट्रात जाण्यासाठी ठराव
पास केला त्यानंतर ती महापालिका कर्नाटकने बरखास्त केली. येथे ग्रामपंचायत तरी बरखास्त करणार आहात का?
नुसती बडबड नको. जर ठराव मांडणार असाल तर सीमा भाग केंद्राने ताब्यात घ्यावा.
असाच ठराव असला पाहिजे आजचा ठराव करा आणि केंद्राकडे पाठवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Web Title :- Maharashtra Karnataka Border Dispute | uddhav thackeray declare karnataka occupied maharashtra union territory till court decision uddhav thackeray demand in legislative council

हे देखील वाचा :

Anti Aging | वृद्धत्व येऊ शकते या डाएटमुळे, खाण्यापूर्वी जाणून घ्या अनेक प्रकारचे दुष्परिणाम

Black Tea For White Hair | पांढऱ्या केसांवर जादूप्रमाणे काम करतो ब्लॅक टी, या ४ पद्धतीने मिळतील ‘डार्क हेअर’

Tomato Benefits | रिकाम्यापोटी का सेवन करावा टोमॅटो? जाणून घ्या याचे ४ जबरदस्त फायदे

Related Posts