IMPIMP

Maharashtra Karnataka Seemawad | महाराष्ट्र पोलिसांना अलर्ट, सीमाभागाच्या महामार्गांवरील बंदोबस्तात वाढ

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Karnataka Seemawad | मंगळवारी (६ डिसेंबर) सकाळी महाराष्ट्राच्या वाहनांवर कर्नाटकमधील बेळगाव येथील हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ दगडफेक करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील गाड्यांवर हल्लाबोल करत कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली आहे. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक करून सहा गाड्याच्या काचा फोडल्या. या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य पोलिस दलाचे कायदा व सुव्यवस्था प्रमुख मिलिंद भारंबे यांनी सीमामार्ग सहित राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस आयुक्त आणि पोलिस अधिक्षकांना बंदोबस्त तैनात करण्याचे आदेश दिले आहे. (Maharashtra Karnataka Seemawad)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद (Maharashtra Karnataka Seemawad) सुरु असताना कन्नड रक्षण वेदिकेने त्यांच्या संघटनेचे झेंडे महाराष्ट्राच्या सीमा लगतच्या गावात फडकावले. त्यानंतर जत, अक्कोलकोट, सोलापूर कर्नाटक राज्यात जाण्याची भूमिका घेत कन्नड रक्षण वेदिकेचे झेंडे फडकावले. त्यात, जत तालुक्यासाठी पाणी सोडून कर्नाटक राज्याने महाराष्ट्राला डिवचले. तसेच महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांना सीमेलगत दौरा घेण्यापासून रोखले. तसेच आज (६ डिसेंबर) सकाळी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक करून सहा गाड्याच्या काचा फोडल्या.

या संपूर्ण घटनांची दखल महाराष्ट्राचे पोलिस महासंचालकाने घेतली असून तातडीने सीमाभाग व सीमेजवळील
महामार्गांवर बंदोबस्त तैनात करण्याचे आदेश राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस आयुक्त आणि पोलिस अधिक्षकांना दिले आहे.
कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी हा संपूर्ण बंदोबस्त केला जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Web Title :- Maharashtra Karnataka Seemawad | maharashtra police has increased security on border highways karnataka maharashtra border

हे देखील वाचा :

Pune Crime | तरुणींना म्हणाले, ‘चल बैठ घुमने जाते है’ आणि गेले पोलीस काेठडीत

SSC HSC Exam | सवलतीच्या गुणांसाठी विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आता 50 रुपये; शिक्षण मंडळाचा निर्णय

Related Posts