IMPIMP

Maharashtra Local Body Election | महाराष्ट्रातील महापालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीच्या निवडणुका कधी होणार ? 17 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात निर्णय

by nagesh
Maharashtra Local Body Election | supreme court directed maharashtra state election commission to announce schedule for local bodies election on 17 may 2022

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनMaharashtra Local Body Election | महाराष्ट्र राज्यातील महापालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीच्या निवडणुका (Maharashtra Mahanagarpalika Municipal ZP Election) कधी होणार, याचे उत्तर लवकरच मिळणार आहे. याबाबत निर्णय आता सुप्रीम कोर्टात (Supreme Court) 17 मे रोजी होणार आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाने आज आपली याचिका सुप्रीम कोर्टात मेन्शन केली. कोर्टाने त्यावर सुनावणीसाठी 17 मे दुपारी दोन वाजताची वेळ ठरवली आहे. (Maharashtra Local Body Election)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

महापालिका नगरपंचायती सप्टेंबरमध्ये तर जिल्हा परिषद ग्रामपंचायती ऑक्टोबरमध्ये घेण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. यावर सुप्रीम कोर्ट पावसाळ्यानंतर निवडणुका घेण्यासाठी मुभा देणार का ? या प्रश्नाचे उत्तर 17 मे रोजी समजणार आहे.

दोन टप्प्यात होऊ शकतात निवडणूका
गेल्या दोन अडीच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या महापालिका, नगरपंचायतच्या निवडणूका आणि जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणूका, अशा दोन टप्प्यांत पावसाळ्यानंतर पार पडण्याची शक्यता आहे. (Maharashtra Local Body Election)

निवडणूका पावसाळ्यात होणार का
सुप्रीम कोर्टाने 4 मे रोजी दिलेल्या निकालात दोन आठवड्यात निवडणूक प्रक्रिया जाहीर करा असे निर्देश दिले होते. त्यानुसार निवडणुका तातडीने घेण्याचे बंधन निवडणूक आयोगावर आहे. त्यामुळे निवडणुका पावसाळ्यात होणार का याबद्दलही कुतूहल निर्माण झाले होते. पण आयोगाने पावसाळ्यात निवडणुका घेण्यात कोणत्या प्रशासकीय अडचणी आहेत याची माहिती सुप्रीम कोर्टातील याचिकेत दिली आहे.

निवडणूक आयोगाने सांगितली ही कारणे –

राज्यात 15 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा, 210 नगरपंचायती, 1900 ग्रामपंचायतीच्या निवडणुका प्रलंबित आहेत.
या सर्व निवडणूका एकत्र घेण्यासाठी त्या किमान 2 ते 3 टप्प्यांत घ्याव्या लागतील आणि 6 आठवडे चालतील.
पावसाळ्यात राज्यात अनेक भागात पूरस्थिती असते.
राज्य कर्मचारी पूर नियंत्रणाच्या कामात व्यस्त असतात.
या काळात सामानाची वाहतूक करणेही अवघड असते.
पावसाळ्यात मतदानाची टक्केवारी कमी होऊ शकते.
– ईव्हीएमची संख्या मर्यादित असल्याने, एका फेरीसाठी वापरलेले ईव्हीएम दुसर्‍या फेरीसाठी वापरावे लागतील.
रिटर्निंग ऑफिसर त्याच त्याच लोकांना वापरावे लागते.
मतदान केंद्रांवर पोलीस फौजफाटा उपलब्ध करणे अवघड होईल.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आमच्या अडचणींचा विचार करावा – आयोग
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार वॉर्ड रचनेची प्रक्रिया आयोगने सुरु केली आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांची प्राथमिक प्रक्रिया आयोग जूनपर्यंत पूर्ण करेल. पण त्यानंतरची प्रक्रिया पावसाळ्यात सुरु करावी लागेल. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाच्या अडचणींचा विचार करावा, अशी विनंती आयोगाने केली आहे.

निवडणूका लांबवू नयेत – न्यायालय
यानंतर सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की, कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ निवडणूक लांबवता येणार नाहीत. तसेच ट्रिपल टेस्ट पूर्ण होईपर्यंत ओबीसी आरक्षण देता येणार नाही. त्यामुळे कुठलेही कारण सांगून निवडणुका लांबवू नयेत. दरम्यान, आयोगाने तयारी सुरू केली असली तरी निवडणूक आयोगाच्या अडचणींचा विचार करुन पावसाळ्यानंतर निवडणूका घेण्याची मुभा कोर्ट देणार का, हा महत्वाचा मुद्दा आहे .

Web Title :- Maharashtra Local Body Election | supreme court directed maharashtra state election commission to announce schedule for local bodies election on 17 may 2022

हे देखील वाचा :

Uric Acid Level | यूरिक अ‍ॅसिडच्या रूग्णांनी आपल्या खाण्या-पिण्याची घेतली पाहिजे विशेष काळजी, पहा खाद्यपदार्थांची यादी

Gold Silver Price Today | सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी ! आठवडाभरात सोन्याच्या दरात 1500 रुपयांची मोठी घट; जाणून घ्या

Aatpadi Nights | ‘आटपाडी नाईट्स’ फेम दिग्दर्शक नितीन सुपेकर घेऊन येत आहेत ‘सरला एक कोटी’

Related Posts