IMPIMP

Maharashtra Lockdown | महाराष्ट्रात लॉकडाऊन कधी लागणार?, आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलंच

by nagesh
Rajesh Tope | height of corona third wave came and went say maharashtra health minister rajesh tope

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Lockdown | राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची (Covid-19) संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यामुळे राज्याची चिंता वाढली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (Maharashtra Government) दिवसा जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. मात्र, मागील काही दिवसांमध्येही रुग्णसंख्या काहीशी स्थिरावत असल्याचे दिसते. दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील कोरोना स्थिती आढावा बैठक पार पडली. त्यानंतर राजेश टोपे यांनी राज्यातील लॉकडाऊनबाबत (Maharashtra Lockdown) महत्वाची माहिती दिली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

राजेश टोपे म्हणाले, ‘राज्याला आज ऑक्सिजनची (Oxygen) मागणी 400 मेट्रीक टन इतकी आहे. यापैकी 250 नॉन कोविड आणि 150 मेट्रीक टन कोविड रुग्णांसाठी लागत आहे. ऑक्सिजनची मागणी 700 मेट्रीक टनवर गेली, की आपण लॉकडाऊन लावणार आहोत, अस राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. तसेच, ‘लसीकरण दर कमी होताना दिसत आहे. दररोज 6 लाख 50 हजार लोकांचे लसीकरण होत आहे. तर कमाल 8 लाख लोकांना लस मिळत आहे. लसीकरणाला वेग दिला आहे. (Maharashtra Lockdown)

पुढे राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले, ‘राज्यात आतापर्यंत 67 टक्के लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.
तर 90 टक्के लोकांचं 1 डोस पूर्ण झाला आहे.
त्याचबरोबर 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षाखालील वयोगटातील 35 टक्के मुलाचं लसीकरण (Vaccination) झालं आहे.
कोव्हॅक्सीन (Covaxin) आणि कोविशील्ड (Covishield) लस कमी पडतेय त्याबाबत मुख्यमंत्र्यांकडून मागणी केली जाणार आहे.
कोव्हॅक्सिन आपण लहान मुलांना देतोय, त्याची मागणी जास्त आहे.
आपल्याला कोव्हॅक्सिनच्या 60 लाख आणि कोविशील्डच्या 40 लाख लसींची गरज असल्याचं देखील ते म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Web Title :-  Maharashtra Lockdown | if demand for oxygen reaches 700 metric tonnes we will lock down in state says maharashtra health minister rajesh tope

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीचे दर वधारले; जाणून घ्या आजचा लेटेस्ट भाव

Pune Crime | पुण्यात बाप-लेकाच्या खूनामुळे प्रचंड खळबळ, हल्लेखोरांची नावे निष्पन्न

Pune Crime | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला कोंढवा पोलिसांकडून अटक

Related Posts