IMPIMP

Maharashtra MLC Election 2022 | राष्ट्रवादीची शिवसेनेवर कुरघोडी’; भाजप नेते प्रविण दरेकरांचा आरोप

by nagesh
Pravin Darekar | mumbai bank financial fraud scam name of pravin darekar dropped from charge sheet

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra MLC Election 2022 | राज्यात विधानपरिषद निवडणुकीच्या (Maharashtra MLC Election 2022) पार्श्वभूमीवर वातावरण तापलं आहे. नुकतंच 20 जून रोजी होणाऱ्या मतदानासाठी नवाब मलिक (Nawab Malik) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी मतदान करता यावं अशी मागणी करणारी याचिका केली होती. दरम्यान मुंबई हाय कोर्टाने (Mumbai High Court) त्यास नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. यानंतर भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

“प्रत्येक पक्षाला विधानपरिषद निवडणूकीत स्वत:ची इभ्रत राखायची आहे, स्वत:चे उमेदवार निवडून आणायच्या भूमिकेत असेल,” असे प्रविण दरेकर यांनी यावेळी म्हटलं आहे.
“जर एखाद्या पक्षाचा एखादा उमेदवार पडला तर पक्षाच्या प्रतिमेला तडा जाणार आहे, त्यामुळे प्रत्येक पक्ष आपले दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
कुणाचेही आणायचे पण आपले दोन निवडून आणायचे या भूमिकेत राष्ट्रवादी पक्ष दिसतो,
यातूनच शिवसेनेला पाठिंबा देणार्‍या अपक्ष आमदारांना चुचकारण्याचा तसेच प्रलोभने देण्याचा प्रयत्न असू शकतो.” असं दरेकर म्हणाले. (Maharashtra MLC Election 2022)

दरम्यान, मुंबई हाय कोर्टाचे न्यायमूर्ती जामदार यांनी हा निकाल देत दोन्ही नेत्यांना धक्का दिला आहे.
गुरुवारी याबाबतची सुनावणी पूर्ण झाली होती. पण, न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.
यापूर्वी राज्यसभा निवडणुकीत सत्र न्यायालयाने (Sessions Court) परवानगी नाकारली होती.
त्यानंतर आता विधान परिषदेचं समीकरण देखील राष्ट्रवादीला नव्याने मांडावं लागणार आहे.

Web Title :- Maharashtra MLC Election 2022 | bjp pravin darekar on ncp hc denies permission to anil deshmukh nawab malik to vote in mlc election 2022

हे देखील वाचा :

Maharashtra MLC Election 2022 | विधान परिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग ! शिवसेना-राष्ट्रवादीकडे पुरेसे संख्याबळ; भाजप, काँग्रेसची अडचण, गणित कसं जुळणार?

Pune Crime | वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना व्याजाने पैसे देऊन वसुलीसाठी मारहाण; खासगी सावकार गजाआड

Maharashtra MLC Election | ‘भाजपचे पाचही उमेदवार विजयी होतील, महाविकास आघाडीतील एकाची विकेट पडेल’ – चंद्रकांत पाटील

Related Posts