IMPIMP

Maharashtra Monsoon Rains | राज्यात ढगाळ वातावरण ! आगामी 5 दिवस काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस?

by nagesh
Maharashtra Monsoon Rains | maharashtra monsoon rain updates monsoon konkan mumbai news

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Monsoon Rains | गेल्या काही दिवसांपासून पावसाची चर्चा होताना दिसत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार Indian Meteorological Department (IMD) पाऊस यंदा लवकरच बरसणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार राज्यात काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली, पुन्हा पावसाने दडी मारली. त्यानंतर काही दिवसानंतर पुन्हा पाऊस सक्रिय झाल्याचं दिसलं. गुरुवारी मुंबईसह (Mumbai) उपनगरात पहाटे पाऊस बरसला. काही क्षण बरसल्यानंतर पाऊस थांबला. दरम्यान राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झालं असलं तरी लोक मोठ्या पावसाची (Maharashtra Monsoon Rains) प्रतीक्षा करताना दिसत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

यंदाच्या वर्षी मान्सूनच्या मोसमातील पंधरवडा कोरडा गेला. काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी निरभ्र आकाश आणि उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण झाले. मागील काही दिवसांपासून पाऊस रेंगाळला होता. विशेष म्हणजे मान्सून पोहोचलेल्या ठिकाणीही पावसाच्या सरींनी मात्र दडी मारली आहे. ज्यामुळे आता शेतकऱ्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. (Maharashtra Monsoon Rains)

राज्यातील मुंबईसह पुणे, कोल्हापूर, सांगली, यवतमाळ, हिंगोली, चंद्रपूर, गोंदिया या भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच शेतीकामांना वेग आला आहे. सध्या पाऊस रेंगाळला आहे. मात्र लोक मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यात दक्षिण कोकणातून 10 जूनला मान्सूनचं आगमन झालं. पुढे 11 जूनपर्यंत पावसानं मुंबई- पुणे गाठलं. 13 जूनला त्यानं निम्मा महाराष्ट्र व्यापला. मुख्य म्हणजे मान्सूनआधी मान्सूनपूर्व सरी देखील राज्यात बरसल्या. पुढे मान्सून आला आणि त्याने आपल्या येण्याची चिन्ह दाखवत रिमझिम पाऊसही झाला.

दरम्यान, हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार, मान्सूनने सध्या निम्मा महाराष्ट्र व्यापला असून, 2-3 दिवसात त्याची विदर्भात प्रगती होण्याचा अंदाज आहे.
मात्र आगामी 5 दिवस राज्यात काही भागांतच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
दक्षिण कोकणात मात्र काही भागांमध्ये 18 जूनपासून पाऊस जोर धरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Maharashtra Monsoon Rains | maharashtra monsoon rain updates monsoon konkan mumbai news

हे देखील वाचा :

Petrol-Diesel Price Today | आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Pune SPPU Admissions Process | पुणे विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू; रजिस्ट्रेशन करण्यासाठी अवघ्या 3 दिवसांचा वेळ

Related Posts