IMPIMP

Maharashtra Monsoon Session | अमोल मिटकरींच्या आरोपांना आमदार महेश शिंदेंचे प्रत्युत्तर, म्हणाले-‘बारामतीला गेलेला पैसा पहा, मग…’

by nagesh
Maharashtra Monsoon Session | look at the money that went to baramati then shout mla mahesh shinde told amol mitkari

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Monsoon Session | पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. एकमेकांच्या अंगावर धावून जाणाऱ्या आमदारांमध्ये राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे (Shinde Group MLA Mahesh Shinde) यांची नावे समोर आली. या घटनेवरुन मिटकरी यांनी आमदार महेश शिंदे यांनी शिवीगाळ केल्यामुळे वातावरण चिघळल्याचा आरोप केला. त्यावर शिंदे गटाचे आमदार शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Maharashtra Monsoon Session)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सध्या पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Session) सुरु असून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणा देण्यात येत आहेत.
याला प्रत्युत्तर देण्यासाठी सत्ताधारी आमदारांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधक आमने – सामने आल्याने हा राडा झाला.

अमोल मिटकरी यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना महेश शिंदे म्हणाले, आम्ही लोकशाहीतील अधिकारानुसार शांततेनं विधानभवनाच्या पायऱ्यांवर (Vidhan Bhavan Steps) ते येण्याआधी पासून आंदोलन करत होतो.
अनिल देशमुखांचे (Anil Deshmukh) 100 खोके, बारामती (Baramati) एकदम ओके अशा घोषणा आम्ही देत होतो.
या त्यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसले. अमोल मिटकरी यांनी अर्वाच्च भाषेत बोलायला सुरुवात केली, असा आरोप शिंदे यांनी केला.

गेल्या चार दिवसांपासून विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आमच्याबद्दल 50 खोके, एकदम ओके अशा घोषणाबाजी करण्यात येत होत्या.
आम्ही काही न बोलता बाजूनं जात होतो.
पण आज जेव्हा आम्ही गेल्या अडीच वर्षात राष्ट्रवादीकडून केल्या गेलेल्या भ्रष्टाचाराबाबत (Corruption) बोललो तर त्यांना चांगलंच झोंबलेलं दिसतंय.
जे अमोल मिटकरी 50 खोके ओरडत आहेत.
त्यांना माझं आव्हान आहे की गेल्या अडीच वर्षात अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीला किती पैसा पाठवला याची माहिती घ्यावी मग खोके खोके ओरडावं, असे महेश शिंदे म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Maharashtra Monsoon Session | look at the money that went to baramati then shout mla mahesh shinde told amol mitkari

हे देखील वाचा :

Pune Crime | हॉटेल मॅनेजरच्या दक्षतेमुळे 3 अल्पवयीन मुली सुरक्षित; नोकरीच्या शोधात दिल्लीतून आल्या होत्या पुण्यात पळून

Diabetes | शुगर लेव्हल वाढताच पायावर दिसू लागतात ‘ही’ लक्षणे, पाय कापण्याची येऊ शकते पाळी

Pune Crime | खडकी येथील शाळेतून 5 वर्षाच्या मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न

Related Posts