IMPIMP

Maharashtra Monsoon Session | विधानभवनात शिंदे गटाची माघार, मात्र व्हिपवरून जुंपली

by nagesh
Maharashtra Politics | yuva sena sharad koli slams eknath shinde group and election commission over shivsena party symbol clashes

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन शिंदे सरकार (Shinde Government) स्थापन झाल्यानंतर पहिले पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Session) सुरु झाले आहे. या अधिवेशनामध्ये (Maharashtra Monsoon Session) शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गट (CM Eknath Shinde Group) पुन्हा एकदा समोरासमोर आले आहेत. पण पक्ष कार्यालयाचा वाद टाळण्यासाठी शिंदे गटाने सातव्या मजल्यावर वेगळे कार्यालय स्थापन केले आहे. त्यामुळे विधिमंडळात शिवसैनिकांचे दोन गट तयार झाले आहेत.

पावसाळी अधिवेशनाला (Maharashtra Monsoon Session) आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने शिवसेना व शिंदे गटामध्ये व्हीप जारी (Issue Whip) करण्यावर दावे प्रतिदावे केले जात आहेत. आम्ही जारी केलेला व्हीप सर्व आमदारांना (MLA) लागू होईल. दप्तरी नोंद असल्याने प्रमाणे नियमानुसार माझी प्रतोद म्हणूनच नियुक्ती आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना व्हीप लागू होईल असा दावा सुनील प्रभू यांनी केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

तर शिंदे गटाचे नेते गोगावले यांनी शिंदे गटाचा व्हीप हा लागू असणार आहे. हा वाद कोर्टामध्ये आहे. त्यामुळे आम्ही जास्त बोलणार नाही, असं गोगावले यांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाला विधान भवनातील सातव्या मजल्यावर पक्ष कार्यालय मिळाले आहे. शिवसेनेचे असलेल्या कार्यालयामध्ये शिंदे गटाच्या आमदारांनी जाण्याचं टाळलं आहे. त्यामुळे विधिमिंडळात दोन शिवसेना कार्यालय तयार झाली आहे. विधान भवनातील तिसऱ्या मजल्यावरील शिवसेना पक्ष कार्यालय ठाकरे गटाकडे राहणार आहे.

नेमका व्हीप कोणाचा ?

ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी जारी केलेला व्हीप शिंदे गटातील आमदारांना लागू होणार का ?
शिंदे गटाचे प्रतोद हे भरत गोगावले (Bharat Gogawle) यांनी जारी केलेला व्हीप शिंदे गटातील आमदारांना लागू होणार का ?
अधिवेशन काळात अनेक विधेयके मंजुरीसाठी येणार, धोरणात्मक बाबीही चर्चेसाठी येतील.
अशा वेळी आम्ही जी भूमिका घेऊ ती शिवसेनेच्या सर्व आमदारांसाठी लागू असेल असा ठाकरे गटाचा दावा आहे.
तर गोगावलेंचा व्हीप कायद्यानुसार, गोगावलेंना विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली आहे.
त्यामुळे प्रभू यांच्या व्हिपला अर्थ उरलेला नाही, असा दावा शिंदे गटाचा आहे. यामुळे व्हीप कोण कुणाचा मानणार हे पहावे लागेल.

Web Title : – Maharashtra Monsoon Session | separate office for cm eknath shinde group in vidhan bhavan controversy broke out over the whip

हे देखील वाचा :

Pune Ahmednagar Highway Accident | पुणे-अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू, मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश

SBI Doorstep Banking | तुमच्या घरापर्यंत येईल बँक, मोफत देईल सर्व सेवा…जाणून घ्या कसा मिळेल लाभ

Pune Pimpri Crime | बारचालकाला जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी, 4 जणांना अटक

Related Posts