IMPIMP

Maharashtra Monsoon Update | राज्यात लवकरच हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता – IMD

by nagesh
Maharashtra Monsoon Update | maharashtra monsoon update no uptick in monsoon over south india to enter weak marathi news

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Maharashtra Monsoon Update | मागील काही दिवसापासून मोसमी पावसाची (Maharashtra Monsoon Rains) चर्चा पसरली आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील (Maharashtra Monsoon Update) काही भागात पावसाने रिपरिप सुरू केली. त्यानंतर पाऊस थंडावला. केरळातून (Kerala) कर्नाटकात (Karnataka) आगमन केलेल्या पावसाने तिथेच मुक्काम केल्याचे चित्र आहे. त्यामुळे महाराष्ट्रात येण्यास त्याला विलंब होत असल्याचं भारतीय हवामान विभागाकडून Indian Meteorological Department (IMD) सांगण्यात येत आहे. दरम्यान आता राज्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (Rain) होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रावर ढगांची दाटी होऊ लागली आहे. हे ढग सध्या विस्कळीत स्वरुपाचे आणि कमी उंचीवर आहेत. मात्र यामुळे हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याचबरोबर कोकण (Konkan), मुंबई (Mumbai) आणि ठाण्यातही (Thane) ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच, शेतक-यांमध्ये मान्सूनच्या वाटचालीबाबत कमालीची उत्सुकता आहे. पण, राज्यात स्वयंघोषित हवामान तज्ज्ञांकडे दुर्लक्ष करा, केवळ हवामान खात्याच्या (IMD) या सूचना पाळा असं आवाहन केले गेले आहे.

दरम्यान, आगामी 5 दिवस पाऊस दक्षिणेतील कर्नाटकात 6 आणि 7 जून रोजी तामिळनाडू 7, 8 आणि
9 जून रोजी केरळ आणि 8 जून रोजी उत्तर कर्नाटकात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
आगामी 5 दिवसांत ईशान्य भारत, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये पावसाचा जोर कायम असल्याचे हवामान खात्यानं सांगितलं आहे.

Web Title :- Maharashtra Monsoon Update | maharashtra monsoon update no uptick in monsoon over south india to enter weak marathi news

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीचे दर घसरले; जाणून घ्या आजचे लेटेस्ट रेट

Petrol-Diesel Price Today | जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

Pune Pimpri Crime | पोलीस अन् कारचोरांचा महामार्गावर ‘थरार’, चोरट्यांकडून पोलिसावर चाकूने वार

Related Posts