IMPIMP

Maharashtra Monsoon Update | राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईला यलो Alert

by nagesh
Maharashtra Monsoon Update | maharashtra monsoon updates rain in konkan mumbai

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Monsoon Update | आगामी पाच दिवसात विश्रांती घेतलेला मान्सून (Maharashtra Monsoon
Update) पुन्हा सक्रिय होणार आहे. राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून (Indian
Meteorological Department-IMD) वर्तवण्यात येत आहे. कर्नाटक, कोकण, गोवा, लक्षद्वीप या भागांमध्येही जोरदार पाऊस होणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. आगामी तीन दिवसांसाठी मुंबईला यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. याठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधधार पावसाची शक्यता आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

महाराष्ट्रातील काही भागांना आगामी पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. शुक्रवारी रायगडमध्ये जोरदार पाऊस असेल, तर रत्नागिरीतही परिस्थिती काहीशी अशीच असणार आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आंध्र प्रदेश या भागातही समाधानकारक पाऊस होणार आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीभागात पुढच्या दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. गुजरातच्या काही भागातही पावसाची हीच स्थिती 26 जूनपर्यंत कायम असण्याची शक्यता आहे. (Maharashtra Monsoon Update)

या दरम्यान, गोवा आणि कोकण भागात पावसाचा अधिक तडाखा बसणार आहे. फक्त महाराष्ट्र आणि दक्षिण भारत नव्हे, तर अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम आणि काही हिमालय पर्वतरांगांच्या प्रदेशातही आगामी 5 ते 6 दिवस जोरदार अथवा तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील काही ठिकाणी पावसाची परिस्थिती निर्माण झाली तर काही ठिकाणी अद्याप प्रतिक्षाच असल्याचं दिसत आहे.

Web Title :- Maharashtra Monsoon Update | maharashtra monsoon updates rain in konkan mumbai

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे यांनी भाजपचा पाठिंबा असल्याचं केलं मान्य, जाहीर केली ही भूमिका

Sanjay Rathod | शिवसेनेचे आमदार संजय राठोड पत्नीचा शब्द धूडकावून गुवाहाटी दाखल

Ajit Pawar | ‘मी कधीच दुजाभाव केला नाही, निधीत काटछाट केली नाही’ अजित पवारांचे बंडखोर आमदारांना उत्तर

Nana Patole On Ajit Pawar | काँग्रेसचा उप मुख्यमंत्र्यांवर मोठा आरोप, म्हणाले – ‘अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना त्रास द्यायचे’

Related Posts