IMPIMP

Maharashtra Police | गणेश विसर्जन मिरवणुकीत खाकी वर्दीतील पोलीस नाचल्यावरुन वादंग, DGP कार्यालयाने दिले ‘हे’ निर्देश

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  Maharashtra Police | कोरोनामुळे (Corona) मागील दोन वर्षे सर्व सण-उत्साव साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले. परंतु यंदाच्या वर्षी सर्व सण उत्साहात साजरे करण्यात येत आहे. नुकतेच गणपती येऊन गेले. पुण्यात गणेशोत्सव (Pune Ganeshotsav) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूकीत ( Pune Ganpati Visarjan Procession) पोलिसांना (Maharashtra Police) देखील आपल्या मनावर आवर घालता आला नाही. विसर्जन मिरवणुकीत पोलीस नाचताना (Dancing), ढोल वाजवताना पहायला मिळाले. यावरुन वादंग निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून (DGP Office) महत्त्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत खाकी वर्दीतील (Khaki Uniform) पोलीस नाचल्याचे व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले. यावरून वाद निर्माण झाला. यामुळे पोलिसांना (Maharashtra Police) खाकी वर्दी घालून नाचण्यास मनाई करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलवंत सरंगळ (Addl DGP Kulwant Sarangal) यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना याबाबत सक्त ताकीद दिली आहे. पोलिसांनी अशाप्रकारे खाकी वर्दीत मिरवणुकीत नाचणे हे अवमानकारक आहे. त्यामुळे पोलिसांनी अंगावर गणवेश असताना मिरवणुकीत नाचू नये, असे निर्देश कुलवंत सरंगळ यांनी दिले आहेत.

कोरोनानंतर गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दरम्यान मिरवणुकांमध्ये पोलीस नाचतानाच्या जवळपास 50 व्हिडिओ क्लिप्स समोर आल्या होत्या.
मुंबईतील जीएसबी सेवा मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीतही पोलीस नाचले होते.
त्यानंतर या प्रकाराच्या अंतर्गत चौकशीचे (Internal Inquiry) आदेश देण्यात आले होते.
यासंदर्भातील अहवाल नुकताच वरिष्ठांना सादर करण्यात आला. यानंतर पोलिसांनी मिरवणुकीत न नाचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिसांनी खाकी वर्दी अंगावर असताना मिरवणुकीत नाचता कामा नये, तशी त्यांना परवानगी नाही. हे कृत्य अवमानकारक आणि अक्षम्य आहे, असे कुलवंत सरंगळ यांनी म्हटले आहे.

तसेच अनेक ठिकाणी पोलीस अधिकारी वैयक्तिक पातळीवर भाषण देताना पहायला मिळाले.
काही ठिकाणी पोलीस ढोल वाजवत होते. याची दखल पोलीस मुख्यालयाने घेत पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) स्तरावरील अधिकाऱ्याला यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
त्यानंतर आता बंदोबस्ताला तैनात असताना अशा प्रकारे कोणत्याही धार्मिक किंवा सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी
न होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Maharashtra Police | maharashtra cops warned against dancing in uniform during ganeshotsav festival maharashtra police news

हे देखील वाचा :

Pune Crime | येवलेवाडीत सव्वा पाच लाखांचा गुटखा गुन्हे शाखेकडून जप्त

Police Personnel Suspended | …म्हणून पुणे शहर पोलिस दलातील 3 पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबीत

Pune Rural Police | डेंग्यूमुळे बारामतीच्या महिला पोलिसाचा पुण्यात मृत्यू, दहा दिवसांचे बाळ झालं पोरकं

Pune Crime | बेकायदेशीर सावकारी ! 6 लाखाचे 17 लाख दिले तरी आणखी 30 लाखाची मागणी करुन जीवे मारण्याची धमकी; चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात FIR

Related Posts