IMPIMP

Maharashtra Police News | पोलिस मुख्यालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या, प्रचंड खळबळ

by nagesh
Maharashtra Police News | maharashtra amravati police officer jumps from fourth floor of police headquarters

अमरावती : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Police News | अमरावती जिल्ह्यातील (Amravati News) एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस मुख्यालयाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आपली जीवन यात्रा संपवली आहे. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली. बाळकृष्ण राठोड (Balkrishna Rathod) (वय, 50) असं आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे (Amravati Police) नाव आहे. (Maharashtra Police News)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

बाळकृष्ण राठोड हे खल्लार पोलीस ठाण्यात (Khallar Police Station) कार्यरत होते. ते आज सकाळी कर्तव्यावर होते. खाली काहीतरी बिनसल्यानं ते नाराज होत इमारतीच्या चौथ्या मजल्यावर गेले, त्यानंतर त्यांनी उडी घेतली. चौथ्या मजल्यावरून उडी घेतल्याने त्यांचा जागीच मृत्यू (Died) झाला आहे. मागील काही दिवसांपासून ते तणावात असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृतदेह शवविच्छेदनासाठी दर्यापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात (Daryapur Sub-District Hospital) दाखल केला आहे. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून कर्तव्यावर असल्याने तणावातून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. (Maharashtra Police News)

दरम्यान, पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येनं पोलिस दलात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास दर्यापूर पोलीस उपविभागीय अधिकारी (Daryapur Police Sub-Divisional Officer) करीत आहेत.

Web Title :- Maharashtra Police News | maharashtra amravati police officer jumps from fourth floor of police headquarters

हे देखील वाचा :

Blood Fat Causes | मधुमेह, लठ्ठपणा असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील चरबीची गंभीर समस्या

Best Multibagger Stock | 2000 रुपयांचे केले 1 लाख, 10 वर्षात मिळाला 5000% रिटर्न; जाणून घ्या

Healthy Pulses | ‘ही’ पिवळी डाळ पोटासाठी सर्वात हेल्दी आणि हलकी, ताबडतोब कमी होते वजन; तात्काळ कमी होतं वजन, जाणून घ्या

Related Posts