IMPIMP

Maharashtra Police | मला आणि माझ्या कुटुंबाला देवेन भारतींपासून धोका; तक्रारदाराची पोलीस सुरक्षा पुरवण्याची मागणी

by nagesh
Maharashtra Police | threat from ips deven bharti for me and my family provide police protection Retired Police Inspector Deepak Kurulkar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनMaharashtra Police | मला आणि कुटुंबाला आयपीएस देवेन भारती (IPS Deven Bharti) यांच्यापासून धोका असून सुरक्षा पुरविण्याची (Provide Police Protection) मागणी निवृत्त पोलीस निरीक्षक दिपक कुरुळकर (Retired Police Inspector Deepak Kurulkar) यांनी केली आहे. 27 डिसेंबरला राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांना पत्र देत कुरुळकर यांनी ही मागणी केली आहे. घुसखोर बांग्लादेशी महिलेला अनधिकृतपणे भारतात प्रवेश करण्यासाठी पासपोर्ट (Passport) बनवून देण्यात आल्याचे हे प्रकरण आहे. (Maharashtra Police)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

काय आहे प्रकरण?
तक्रारदार कुरुळकर यांनी केलेल्या आरोपानुसार, घुसखोर बांग्लादेशी महिला (Bangladeshi Woman) आरोपी रेश्मा खान (Reshma Khan) हिने अनधिकृतपणे व योग्य त्या कागदपत्रांशिवाय भारतात प्रवेश करुन इतर साथीदारांच्या संगनमताने बनावट कागदपत्रे (Fake documents) तयार करुन भारताचा पासपोर्ट तयार केला. याप्रकरणी कुरुळकर यांनी तक्रार देऊनही आरोपी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सध्या सहायक पोलीस आयुक्त असलेले दीपक फटांगरे (ACP Deepak Phatangare) आणि तत्कालीन सहपोलीस आयुक्त Joint CP (कायदा आणि सुव्यवस्था) देवेन भारती यांनी तक्रार दाखल केली नाही. तसेच तक्रार दाखल न करण्यासाठी दबाव आल्याचा आरोप केला आहे. (Maharashtra Police)

याप्रकरणी गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक (Criminal Intelligence Unit) चे पोलीस निरीक्षक मिलिंद काठे (Police Inspector Milind Kathe)
यांच्या मार्गदर्शनाखाली मालवणी पोलीस ठाण्यात (Malvani police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 1436/2021 हा भारतीय दंडविधान संहिता कलम 465,467,468,471,420 आणि 34 तसेच
कलम 12 (1-अ) (ब) भारतीय पारपत्र अधिनियम 1967 सह नियम क्रमांक 3,6 पारपत्र (भारतामध्ये प्रवेश करण्याबाबत नियम) 1950,
सह कलम 3 परिपत्रकान्वये भारतामध्ये प्रवेश करण्याबाबत अधिनियम 1920 सह कलम 3(1) विदेशी नागरीक
याबाबतचा अध्यादेश 1948 सह कलम 13,14(अ) आणि (ब) विदेशी नागरीकाबाबत अधिनियम 1946 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सीआयु (CIU) करीत आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Maharashtra Police | threat from ips deven bharti for me and my family provide police protection Retired Police Inspector Deepak Kurulkar

हे देखील वाचा :

Pune Navale Bridge Accident | ‘पुण्यातील नवले पुलावरील अपघातांचे सत्र कधी थांबणार? शिवसेनेचे ‘NHAI’ कार्यालयावर जनआक्रोश आंदोलन

Pune Crime | अहमदाबाद ‘सीपी’ विजयसिंग बोलतोय..! पैसे पाठव, पोलिसांना गंडा घालणारा गजाआड

Earn Money | 5000 रुपये खर्च करून घरबसल्या कमवा लाखो रुपये महिना, ताबडतोब जाणून घ्या पद्धत

Related Posts