IMPIMP

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदेंना आमदारकी वाचवण्यासाठी 3 पर्याय, राज्यात पुन्हा राजकीय भूकंप ?; मनसे नेत्याने सांगितले…

by nagesh
Maharashtra Political Crisis | 3 options before eknath shinde to save government says mns leader prakash mahajan

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक 40 आमदारांनी शिवसेनेत बंड करुन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Party Chief Uddhav Thackeray) यांना आव्हान दिले आहे. शिंदे गटाने (Shinde Group) बंडखोरी केल्यामुळे राज्यात अस्तित्वात असलेले महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi Govt) कोसळले आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा (Resignation) द्यावा लागला. यानंतर घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर (Maharashtra Political Crisis) एकनाथ शिंदे यांनी भाजप (BJP) सोबत सरकार स्थापन केले. तसेच विधानसभेत 163 सदस्यांचे बहुमत (Majority) सिद्ध झाल्याने राज्यात शिंदे सरकार स्थापन झाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

शिंदे गटाने शिवसेनेत बंडखोरी करुन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला. तर मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन महिना होत आला तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) झालेला नाही. शिवसेनेच्या ठाकरे गटाने शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस (Disqualification Notice) दिली होती. यावरून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात (Supreme Court) पोहोचले. कोर्टाने या प्रकरणावर सुनावणी घेण्यासाठी खंडपीठाची नियुक्ती केली. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मुख्यमंत्र्यांसह 15 आमदारांवर अपात्रतेची (Maharashtra Political Crisis) टांगती तलवार आहे.

पक्षांतर बंदी घटनेच्या 10 व्या तरतुदीनुसार शिंदे गटातील समर्थकांना आमदारकी वाचवण्यासाठी दुसऱ्या पक्षात विलीन व्हाव लागेल असा दावा केला जात आहे. परंतु आम्ही शिवसेनेत आहोत असा प्रतिदावा शिंदे गटाकडून वारंवार केला जात आहे. आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर 1 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. कोर्टाचा जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत सर्वकाही अधांतरीच आहे. मात्र त्यात मनसे नेते प्रकाश महाजन (MNS Leader Prakash Mahajan) यांनी शिंदे गटासमोर 3 पर्याय उपलब्ध असल्याचे सांगितले आहे. त्यात तिसरा पर्याय सर्वोत्तम असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

प्रकाश महाजन यांनी सांगितलेले 3 पर्याय

1. प्रकाश महाजन यांनी सांगितल्यानुसार, पहिला पर्याय म्हणजे एकनाथ शिंदे गट स्वतंत्र अस्तित्व ठेवण्याचा प्रयत्न करतील.
त्यामुळे भाजपसोबत असलेली बार्गेनिंग पॉवर तेवढीच राहील.
यातील कुणीही पक्ष सोडल्याची भाषा केली नाही म्हणून ते शिवसेना म्हणून राहू शकतात.

2. शिंदे गटासमोर दुसरा पर्याय म्हणजे त्यांना भाजपमध्ये विलील व्हावं लागेल.
मात्र भाजपच्या समुद्रात तुमचं ताब्याभर पाणी टाकल्यासारखं आहे. मग तुम्हाला स्वतंत्र अस्तित्व राहणार नाही.
हे ओळखण्या इतपत एकनाथ शिंदे चाणक्ष्य आहेत.

3. तर तिसरा पर्याय म्हणजे दुसऱ्या पक्षात विलीन होण्याची वेळ आली तर त्यांच्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena).
याचं कारण ठाकरे नाव येईल, हिंदुत्वाची प्रखर भूमिका आहे. राज ठाकरेंसारखा लोकप्रिय नेता आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) आणि एकनाथ शिंदे यांचे चांगले संबंध आहेत.
ठाण्यात स्थानिक पातळीवर अनेकवेळा त्यांनी एकमेकांना सहकार्य केलं आहे.
तसेच राज ठाकरे यांनीही जर असा प्रस्ताव आला तर विचार करेन असंही म्हटल्याचे प्रकाश महाजन यांनी सांगितले.

Web Title : –  Maharashtra Political Crisis | 3 options before eknath shinde to save government says mns leader prakash mahajan

हे देखील वाचा :

Monkeypox Cases Rise | मंकीपॉक्सला रोखण्यासाठी WHO चा सल्ला; म्हणाले – ‘सेक्स पार्टनर्सची संख्या कमी करा’

Mamata Banerjee | ममता बॅनर्जी अ‍ॅक्शन मोडमध्ये ! घोटाळ्यात नाव येताच पार्थ चॅटर्जींची मंत्री पदावरून हकालपट्टी

Sonia Gandhi – Smriti Irani | ‘Don’t Talk to me’ संसदेत स्मृती इराणी आणि सोनिया गांधींमध्ये शाब्दीक चकमक

Related Posts