IMPIMP

Maharashtra Political Crisis | भाजपकडून शिंदे गटाला मोठी ऑफर?; एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री? 8 कॅबिनेट, 5 राज्यमंत्री पदे अन्…

by nagesh
Maharashtra Political Crisis | bjp and shiv sena government to be formed in the maharashtra this is the strategy of the shinde group maharashtra political crisis

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Political Crisis | मागील दोन दिवसांपासून राज्यात मोठ्या घडामोडी घडताना (Maharashtra Political Crisis) दिसत आहेत. त्यामुळे या घडामोडींवर राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहीले आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतलेल्या भूमिकेवरुन राज्यातील राजकारण ढवळून निघत आहेत. सध्या शिंदे गटात आमदारांची संख्या वाढताना दिसत आहे. जवळपास 45 ते 47 आमदार शिंदे गटात असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याचबरोबर भाजपसोबत (BJP) युती झाल्यास भाजपकडून एकनाथ शिंदेंना मोठी ऑफर देण्यात आल्याची चर्चा पसरली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

राज्यातील राजकारण बदलले असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीला रवाना झाले होते. आजपर्यंत फडणवीस यांची यावर प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र, शिंदे गटाला आपल्याकडे वळविण्यासाठी तयारी सुरु केली आहे. यातच शिंदेंकडे शिवसेनाच नाही तर अपक्ष आमदारही असल्याने शिंदेंचे पारडे मजबूत झाले आहे. त्यातच भाजपकडून शिंदे गटाला ऑफर दिल्याची माहिती समोर येत आहे. (Maharashtra Political Crisis)

एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद, 8 कॅबिनेट मंत्री पदे, 5 राज्य मंत्रीपद देण्यात येण्याची शक्यता आहे.
याशिवाय केंद्रातही सत्तेत वाटा देण्यात येण्याची शक्यता आहे. केंद्रात दोन मंत्री पदे देण्यात येतील.
असं देखील सांगण्यात येत आहे. अशी माहिती सूत्राकडून मिळत आहे.
दरम्यान, आता एकनाथ शिंदे भाजपाने दिलेल्या ऑफरवर चर्चा करणार असल्याचे समजते.
एकनाथ शिंदेंकडे शिवसेनेचे 46 आमदार असल्याची माहितीही समोर येत आहे.

Web Title :- Maharashtra Political Crisis | big offer from bjp to eknath shinde revolt 8 cabinet 5 minister of state posts share in the center power shivsena

हे देखील वाचा :

Ramdas Athawale | ‘…म्हणून अजित पवारांसारखं एकनाथ शिंदेंचं बंड फसणार नाही’; रामदास आठवलेंनी स्पष्टच सांगितलं

Chandrakant Patil | ‘महापूजा करायला कोणते मुख्यमंत्री येणार हे विठुमाउलींनाच ठाऊक’ – चंद्रकांत पाटील

Eknath Shinde | भाजपकडून शिंदे गटाला मोठी ऑफर; एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री?

Related Posts