IMPIMP

Maharashtra Political Crisis | शिवसेनेच्या 40 बंडखोर आमदारांच्या PSO, पोलिस कॉन्स्टेबल, कमांडोंवर कारवाई !

by nagesh
Maharashtra Political Crisis | Can there be a presidential rule in maharashtra Can 16 MLAs be suspended Find out the opinion of experts ulhas bapats reaction

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनMaharashtra Political Crisis | शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Shivsena Leader Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत आमदारांसह आधी गुजरातमधील सूरत येथे गेले. त्यानंतर तेथून हे सर्व आमदार गुवाहाटी येथे गेले. आमदार राज्याबाहेर जात असताना याबाबत प्रशासनाला माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत (Maharashtra Political Crisis) बंड केलेल्या 40 आमदारांच्या PSO अर्थात पर्सनल सिक्योरिटी ऑफिसर (Personal Security Officer), कमांडो (Commando) आणि कॉन्स्टेबल (Constable) यांच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती आहे. पोलिसांना याबाबत कुणकुणही लागली नाही, याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी गृहखात्यावर नाराजी व्यक्त केली होती.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

राज्य सरकार (State Government) या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करणार आहे. या सर्व आमदारांनी बंड केल्यानंतर महाराष्ट्राची हद्द सोडत असताना या सर्व अधिकाऱ्यांनी प्रशासनाला आणि गुप्तचर विभागाला (Intelligence Department) माहिती न दिल्याने या सर्वांवर कारवाईचे (Action) आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना त्या त्या जिल्ह्यातील आमदारांच्या या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले असल्याची देखील माहिती आहे.

बंडखोरी करण्याची तयारी मागील 6 महिन्यापासून?
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करण्याची तयारी मागील सहा महिन्यापासून सुरु केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती.
तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पाच ते सहा वेळा गृहखात्याकडून शिंदे
यांच्या भाजप (BJP) नेत्यांशी वाढत्या भेटींबाबत आणि संशयास्पद हालचालींची माहिती देण्यात आली होती,
अशीही माहिती मिळत आहे. इंटेलिजन्सचा रिपोट मिळून देखील मुख्यमंत्र्यांकडून याकडे दुर्लक्ष झाल्याने
ही परिस्थिती निर्माण झाल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एका वृत्तवाहिनीला दिली.

Web Title :- Maharashtra Political Crisis | eknath shinde action taken against shiv sena mla pso commando and police constable maharashtra political crisis

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का, गटनेतेपदी अजय चौधरींना मान्यता; आमदारांवरील कारवाईबाबत ‘हा’ निर्णय

Chandrakant Patil | ‘… तर राज्यातील घडामोडींशी भाजपचा संबंध नाही’ – चंद्रकांत पाटील

CM Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; ‘जे गेलेत त्यांचा विचार करू नका….’

Related Posts