IMPIMP

Maharashtra Political Crisis | शिवसेनेनं उरलेल्या 14 आमदारांना केलं ‘बंधन’ मुक्त, ज्यांना मतदारसंघात जायचे त्यांनी जावं; शिवसेनेचे अखेर आमदारांना फर्मान

by nagesh
Uddhav Thackeray| take decisions that will keep mumbais environment good what is uddhav thackerays appeal to the government

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनMaharashtra Political Crisis | मागील चार दिवसापासून राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी होत
असल्याचे पहायला मिळत आहे. शिवसेनेच्या आमदारांचे (Shivsena MLA) बंड काही केल्या थांबण्याची चिन्हे दिसत (Maharashtra Political
Crisis) नाहीत. एक एक करुन शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना गुवाहाटीला जाऊन भेटत आहेत. आतापर्यंत शिंदे
यांच्याकडे 41 आमदार एकत्र आले आहेत. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे केवळ 14 आमदार उरले आहेत. त्यामुळे आता शिवसेनेने आशा सोडली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, शिवसेनेने हॉटेलमध्ये थांबलेल्या आमदारांना बंधनमुक्त केले आहे. तुम्हाला तुमच्या मतदारसंघात जायचे असेल तर जा, असं फर्मानच शिवसेनेने आपल्या आमदारांना दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे बंधनमुक्त झालेले आमदार आपल्या मतदारसंघात जातीत की थेट गुवाहाटी (Guwahati) गाठतात हे पाहावं लागेल. तर हॉटेलमध्ये असलेल्या काही आमदारांनी गुवाहाटी येथे शिंदे गटात सहभागी होणे पसंत केले आहे. (Maharashtra Political Crisis)

शिवसेनेचे 55 आमदार असून या आमदारांमध्ये आपल्याच नेतृत्वाविरोधात नाराजी होती. मुख्यमंत्री (CM) कोणालाच भेटत नसल्याचा या आमदारांचा दावा होता. त्यामुळे हे आमदार मुख्यमंत्र्यांवर नाराज होते. विधान परिषद निवडणुकीनंतर (Vidhan Parishad Election 2022) हे आमदार एकनाथ शिंदे याच्यासोबत सुरतला गेले. सुरुवातीला शिंदे यांच्यासोबत 13 आमदार होते, यानंतर यामध्ये वाढ होऊन आमदारांची संख्या 32 झाली. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), सदा सरवणकर (Sada Sarvankar), दीपक केसरकर (Deepak Kesarkar), आणि मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar) हे आमदार शिंदे यांना गुवाहाटीत जाऊन मिळाले आहेत. यामुळे शिवसेना अधिकच कमकुवत झाली आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेनेने आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं होतं. ते आमदार काहीना काही बहाणा करुन शिंदे यांना जाऊन मिळत आहेत. गुलाबराव पाटील यांनी तर आजारी असल्याचे सांगून जळगावला जात असल्याचे सांगून जळगावला गेले. आणि तेथून थेट गुवाहाटी गाठली. त्यामुळे आपले आमदार आपल्या हातातून निसटत असल्याचे ठाकरे यांच्या लक्षात आले. तसेच ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडून आता सत्तेत राहायचं नाही असं ठरवूनच टाकलं आहे. त्यामुळे त्यांनी आमदारांना मतदारसंघात जायचं असेल तर जा, असा निरोप पाठवला आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणते आमदार उरले

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), अजय चौधरी (Ajay Chaudhary), संजय पोतनीस (Sanjay Potnis),
सुनिल प्रभू (Sunil Prabhu), रविंद्र वायकर (Ravindra Waikar), सुनिल राऊत (Sunil Raut),
प्रकाश फातर्पेकर (Prakash Fatarpekar), रमेश कोरगावकर (Ramesh Korgaonkar), राजन साळवी (Rajan Salvi),
दिलीप लांडे (Dilip Lande), वैभव नाईक (Vaibhav Naik), उदय सामंत (Uday Samant), अंबादास दानवे (Ambadas Danve),
भास्कर जाधव (Bhaskar Jadhav), कैलास पाटील Kailas Patil (रिटर्न), नितीन देशमुख Nitin Deshmukh (रिटर्न)

Web Title :- Maharashtra Political Crisis | go back to your constituency cm uddhav thackeray to shiv sena mla maharashtra political crisis

हे देखील वाचा :

Diabetes Tips | पाकातील गुलाबजाम खा किंवा जिलेबी, खाल्ल्यानंतर केवळ करा हे सोपे काम, कधीही वाढणार नाही Blood Sugar

Sanjay Raut | ‘महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार, पण…’ – संजय राऊत यांचं मोठं विधान

7th Pay Commission | 52 लाख कर्मचार्‍यांना होणार लाभ, फिटमेंट फॅक्टरबाबत खुशखबर !

Rule Change | 1 जुलैपासून बदलणार आहे SBI, RTO, TDS, Aadhar-PAN Card सह अनेक नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

Related Posts