IMPIMP

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं, राज्यपाल घटनाबाह्य वागतात; शिवसेनेचा आरोप

by nagesh
 Eknath Shinde Cabinet | swearing in ceremony of the eknath shinde cabinet likely to held on 4th or 5th july

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइनMaharashtra Political Crisis | राज्याच्या सत्तासंघर्षात एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री
म्हणून गुरुवारी शपथ घेतली. भाजपने (BJP) शिंदे गटाच्या 50 आमदारांना पाठिंबा देऊन राज्यामध्ये बंडखोरांचे सरकार (Rebel Government)
स्थापन केले. काल झालेल्या शपथविधी समारंभात (Maharashtra Political Crisis) एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) पदाची शपथ घेतली. मात्र आता शिंदे सरकारसमोर नवा कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. निलंबनाची (Suspension) कारवाई असताना एकनाथ शिंदे यांचा शपथविधी कसा झाला? असा प्रश्न शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी विचारला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

शिवसेनेचे प्रवक्ते (Shivsena Spokesperson) आणि खासदार अरविंद सावंत म्हणाले की, मुख्यमंत्रिपद शिवसेनेला द्यावं हीच मागणी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) करत होते. मात्र भाजपने अडीच वर्षापूर्वी ते केले नाही. परंतु आता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवलं. राज्यपाल (Governor) घटनाबाह्य वागतात. शपथविधीला सर्वात मोठ्या पक्षाला बोलवलं जातं. मग एकनाथ शिंदे यांना काय म्हणून बोलावलं. निलंबनाची नोटीस असताना शपथविधी कसा झाला? अपात्रतेची कारवाई होण्याबाबत सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका आहे. 11 जुलैला सुनावणी होणार आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. (Maharashtra Political Crisis)

त्याचसोबत मंत्रिमंडळात (Cabinet) सहभागी होणार नाही असं फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले. त्यानंतर दिल्लीवरुन फोन आल्यानंतर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पक्षाच्या आदेशाचा मान देवेंद्र फडणवीस यांनी राखला पण हीच पक्षशिस्त एकनाथ शिंदे यांच्यात कुठे आहे? असं सांगत अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.

Web Title :- Maharashtra Political Crisis | how was eknath shinde sworn in when there was a notice of suspension shiv senas question maharashtra political crisis

हे देखील वाचा :

Chief Minister of Maharashtra | साताऱ्याने महाराष्ट्राला दिले चार मुख्यमंत्री

Maharashtra Assembly Speaker Election | विधानसभेचे नवे अध्यक्ष कोण?; राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा, पण कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

Shivsena MP Sanjay Raut | ‘फडणवीस हे मुख्यमंत्री शिंदे यांचे राईट हॅंड’ – संजय राऊत

Related Posts