IMPIMP

Maharashtra Political Crisis | देवेंद्र फडणवीसांचा फोटो शेअर करत भाजप नेत्याचं सूचक ट्विट; म्हणाले – ‘मी पुन्हा येईन…’

by nagesh
Devendra Fadnavis | devendra fadnavis special cyber prject in the state steps will be taken by the state government to crack down on pornographic disorders

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Political Crisis | शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीमुळे राज्याच्या राजकीय वातावरणात संघर्ष (Maharashtra Political Crisis) निर्माण झाला आहे. शिंदे गटात अपक्षांसह 50 इतके आमदार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता शिंदे गट आणि भाजप (BJP) यांच्यात सत्तास्थापनेच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. अशातच भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी सूचक विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वातावरणात चर्चांना उधाण आलं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सूरत येथे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसोबत मोहित कंबोज यांचे फोटो समोर आले होते. त्यानंतर गुवाहाटीतही मोहित कंबोज या आमदारांसोबत असल्याचं समजते. मोहित कंबोज यांनी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा एक फोटो शेअर करत सूचक ट्विट केलं आहे. त्यामध्ये फडणवीसांनी विधानसभेत म्हटलेली शायरीचा उल्लेख आहे. “मेरा पानी उतरता देख किनारे पर घर मत बना लेना. मै समंदर हू लौटकर जरूर आऊंगा” असं ट्विट कंबोज यांनी केलं आहे. (Maharashtra Political Crisis)

दरम्यान, या राजकीय घडामोडीमुळे शिवसेना (Shivsena) आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi Government) अस्वस्थता पसरली आहे.
त्यामुळे एकीकडे भाजपने बैठकांचं सत्र सुरू केलं आहे. तर दुसरीकडे शिंदे गट देखील सत्ता स्थापनेसाठी हालचाली करत आहेत.
सध्या एकनाथ शिंदे यांच्या बंडाने शिवसेनेला हादरा दिला आहे.
शिवसेनेचे तब्बल 39 आमदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत.
भाजपासोबत सरकार बनवावं अशी आग्रही मागणी या गटाने केल्याने राज्यातील राजकीय वातावरणात मोठी चर्चा रंगली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Maharashtra Political Crisis | i will come again mohit kambojs suggestive tweet tweeting a photo of devendra fadnavis maharashtra political crisis

हे देखील वाचा :

Blinkit सोबतच्या डीलनंतर Zomato च्या शेअरची स्थिती बिकट, 9 टक्केपेक्षा जास्त घसरून येथे पोहचला भाव

Maharashtra Political Crisis | 8 कॅबिनेट मंत्री – 5 राज्यमंत्री; एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ! भाजपासोबत ‘या’ फॉर्म्युलावर सरकार बनवण्याची तयारी

MP Sanjay Raut | ‘…अन्यथा फडणवीसांसह मोदींची प्रतिष्ठाही धुळीस मिळेल’ – संजय राऊत

Related Posts