IMPIMP

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का, गटनेतेपदी अजय चौधरींना मान्यता; आमदारांवरील कारवाईबाबत ‘हा’ निर्णय

by nagesh
Eknath Shinde | CM eknath shindes latest speech eknath shindes direct warning to shiv sena party chief uddhav thackeray sanjay raut and mva leaders

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनMaharashtra Political Crisis | राज्यातील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Shivsena Leader Eknath Shinde) यांनी पक्षाविरोधात बंड केला आणि शिवसेनेत वादळ आलं. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारचं (Mahavikas Aghadi Government) अस्तित्व (Maharashtra Political Crisis) धोक्यात आलं. एकीकडे सरकार टिकवण्यासाठी सत्ताधाऱ्यांमध्ये खलबतं सुरु आहेत. तर दुसरीकडे पक्ष वाचवण्यासाठी शिवसेनेची धडपड सुरु आहे. अशातच या सर्व घडामोडीमागे भाजपचा (BJP) हात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

बंड केल्यानंतर शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरुन उचलबांगडी करुन शिवडी विधानसभेचे आमदार अजय चौधरी (Shivdi Assembly MLA Ajay Chaudhary) यांना गटनेते पदावर नियुक्त केले. यावर आक्षेप घेत एकनाथ शिंदेच गटनेते (Group Leader) असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर अनेक दावे-प्रतिदावे केले जात होते. अशातच आता शिवसेना विधिमंडळ गटनेता पदावर अजय चौधरी तर प्रतोद पदावर सुनिल प्रभू (Sunil Prabhu) यांना विधीमंडळानं मान्यता दिली आहे. अजय चौधरी यांची गटनेते पदी विधीमंडळाच्या डायरीत नोंद झाली आहे. गटनेतेपदी अजय चौधरी यांनाच मान्यता दिली गेली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Assembly Vice President Narhari Zirwal) यांच्या आदेशाने ही नोंद केली गेली आहे. तर 12 आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत ऑनलाइन सुनावणी होणार आहे. एका दिवशी 4 आमदारांची सुनावणी होणार आहे.( Maharashtra Political Crisis)

आमदारांवर नेमकी काय कारवाई होऊ शकते?

– शिवसेनेकडून अपात्रतेबाबत विधानसभा उपाध्यक्षांकडे याचिका दाखल करण्यात आल्यानंतर आता विधानसभा उपाध्यक्ष त्या 12 आमदारांना नोटीस देऊ शकतात.

आमदारांना नोटीस पाठवल्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष नोटीस बाबत नेमकं त्या आमदारांचं काय म्हणण आहे, याबाबत जाणून घेतील.

कोरोनानंतर देखील आमदारांना ऑनलाइन सुनावणी हवी आहे की ते स्वत: याठिकाणी येऊन सुनावणीसाठी उपस्थित राहणार हे ठरवलं जाईल.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

जर ते ऑनलाईन उपस्थित राहू इच्छित असतील तर त्यासाठी नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटरकडून (National Informatics Centre) देण्यात आलेल्या बँडविडथचा (Bandwidth) वापर करावा लागणार आहे.
सध्याच्या परिस्थिती या बँडविडथची उपलब्धता पाहता दिवसाला केवळ 2 किंवा 4 आमदारांची सुनावणी पार पडू शकते.

ही अर्धन्यायिक प्रक्रिया आहे. यासाठी विशिष्ट वेळेची मर्यादा नाही.
परंतु विधान भवनाच्या वतीने ही सुनावणी लवकरात लवकर पार पडावी यासाठी प्रयत्न होणारं आहेत.

Web Title :- Maharashtra Political Crisis | leader ajay chaudhary selected as shivsena group leader hearing on disqualification of mla is online

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | ‘… तर राज्यातील घडामोडींशी भाजपचा संबंध नाही’ – चंद्रकांत पाटील

CM Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; ‘जे गेलेत त्यांचा विचार करू नका….’

Pune Crime | बसण्यास खुर्ची न दिल्याने टोळक्यांचा कात्रजमध्ये ‘राडा’ ! दोघा तरुणावर वार करुन हॉटेलवर केली दगडफेक, कोंढव्यात गुन्हा दाखल

Related Posts