IMPIMP

Maharashtra Political Crisis | ‘राज्यसभेत सेनेचा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून घटक पक्षांचा प्रयत्न’ – उदय सामंत

by nagesh
Uday Samant | cabinet minister uday samant tweet appeals some leaders to speak properly

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Political Crisis | शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत अपक्षांसह जवळपास 50 इतके आमदार आहेत.
त्यामुळे शिंदे गटाचे संख्याबळ मजबूत झाल्याचे दिसते. त्यामुळे शिवसेना (Shivsena) आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये (Maha Vikas Aghadi Government) सत्ता संघर्ष पाहायला मिळत आहे.
काही दिवसापूर्वी मंत्री उदय सामंतही (Uday Samant) शिंदे गटात दाखल झालेत.
दरम्यान, उदय सामंत यांनी मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर मोठा आरोप केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

“राज्यसभेत शिवसेनेचा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून घटकपक्षांकडून प्रयत्न करण्यात आल्याचं,” उदय सामंत यांनी सांगितलं.
“मागील काही दिवसांपासून शिवसेना पक्ष कमकुवत करण्याचे जे कारस्थान घटक पक्षांकडून सुरू आहे त्याला कंटाळून मी गुवाहाटी येथे आलोय.
राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी नाकारून पक्षाने एका सच्चा शिवसैनिकाला राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला,
मात्र त्या निवडणुकीतही हा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून मित्रपक्षांनी प्रयत्न केले असल्याचा,” आरोप सामंत यांनी केला आहे. (Maharashtra Political Crisis)

पुढे बोलताना सामंत म्हणाले, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)
यांना अभिप्रेत असलेले हिंदुत्व पुढे घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
असं असलं तरीही आजही मी शिवसेनेतच असून त्याबद्दल सर्वसामान्य शिवसैनिकांनी कोकणातील जनतेने कोणताही गैरसमज करून घेऊ नये,” असं आवाहन त्यांनी केलं आहे.

Web Title :- Maharashtra Political Crisis | ncp and congress parties try to prevent sena candidate from getting elected in rajya sabha uday samants big allegation sambhaji raje eknath shinde uddhav thackeray maharashtra political crisis

हे देखील वाचा :

CM Uddhav Thackeray | CM उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाला भावनिक आवाहन; म्हणाले – ‘कुटुंबप्रमुख म्हणून सांगतोय, समोर या बसून मार्ग काढू’

EKZ Motion Poster | ‘एकदा काय झालं!!’ येणार ५ ऑगस्टला ! डॉ. सलील कुलकर्णी यांचा दुसरा चित्रपट, सुमीत राघवन यांची मुख्य भूमिका

Yoga Asanas For Blocked Nose | बंद नाकाच्या समस्येने त्रस्त असाल तर या तीन आसनांच्या सरावाने सर्दीपासून मिळेल आराम; जाणून घ्या

Related Posts