IMPIMP

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदेंचा मोठा दावा; म्हणाले – ’35 नव्हे 40 आमदार माझ्यासोबत, आणखी 10 येतील”

by nagesh
Eknath Shinde | CM eknath shindes latest speech eknath shindes direct warning to shiv sena party chief uddhav thackeray sanjay raut and mva leaders

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Political Crisis | मंगळवारी सकाळपासून राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना (Maharashtra Political Crisis) दिसत आहे. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठं पाऊल उचललं आहे. त्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या एकनाथ शिंदेसह आमदार आसामच्या गुवाहटीत (Guwahati) दाखल झाले आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी यावेळी मोठा दावा केला आहे. “माझ्यासोबत केवळ 35 नाही, तर 40 शिवसेना आमदारांचा पाठिंबा आहे. तसेच, आणखी 10 आमदार सोबत येणार आहेत,’ असा मोठा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “बाळासाहेबांचं हिंदुत्व आम्ही पुढे घेऊन जात आहोत. त्यांच्या मार्गावरच आमची वाटचाल राहील. माझ्यासोबत शिवसेनेचे 40 आमदार आहेत आणि आणखी 10 आमदार सोबत येणार आहेत”, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. (Maharashtra Political Crisis)

गुजरातच्या सूरतहून हे सर्व बंडखोर आमदार आता गुवाहटी मध्ये दाखल झाले आहेत.
आमदारांसोबत कोणताही संपर्क राहू नये यासाठी त्यांना गुवाहटीला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पण एकनाथ शिंदे अजूनही भाजपासोबत सत्ता स्थापनेच्या मुद्द्यावर ठाम आहेत.
त्यामुळे राज्यात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवण्यात येत आहे.

कालच एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची फोनवर चर्चा झाली.
उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना परत येण्याचं आवाहन केलं आहे. पण एकनाथ शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचं एक आव्हानच एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Maharashtra Political Crisis | not 35 but 40 shivsena mlas with me 10 more will come eknath shinde Maharashtra Political Crisis

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोने आणि चांदीचे दर

Maharashtra Monsoon Update | राज्यात 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; काही ठिकाणी ऑरेंज Alert

Purandar Upsa Irrigation Scheme | पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या पाईपलाईनचे काम केवळ 40 दिवसात पूर्ण

Shobhatai Rasiklal Dhariwal | शोभाताई आर धारीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री मदनबाई धारीवाल रुग्णालयास सुसज्ज रुग्णवाहिकेचे लोकार्पण

Related Posts