IMPIMP

Maharashtra Political Crisis | आता राजभवनातून भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून सूत्र हलणार ?

by nagesh
Bhagat Singh Koshyari | maharashtra governor bhagat singh koshyari explanation after controversial statement about mumbai

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | राज्यात सुरु असणाऱ्या नाटकीय घडामोडींमध्ये आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची लवकरच एन्ट्री होणार असल्याचे दिसतंय. कोरोना झाल्याने कोश्यारी यांची प्रकृती अस्वस्थ होती. त्यांना मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने माघार (Maharashtra Political Crisis) घेण्यास नकार दिल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच शिवसेनेने 16 आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव (MLA Suspension Proposal) दिल्याने संपूर्ण मंत्रिमंडळाच घटनात्मक पेचाला सामोरं जावं लागू शकतं.

ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपचे केंद्रीय नेते सक्रीय झाले आहेत. त्यानुसार राज्यात लवकरच सत्तांतराची नांदी पाहायला मिळू शकतो. कायदेशीर लढाया आणि घटनात्मक पेच मार्गी लावण्यासाठी लवकरच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सक्रीय होणार असल्याचे समोर येत आहे. त्यांची प्रकृतीत सुधारणा झाल्याने कोश्यारी अ‍ॅक्टिव्ह होणार आहेत.(Maharashtra Political Crisis)

विधान परिषदेच्या निकालानंतर (Legislative Council Result) 48 आमदांसह एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) अस्थिरतेची टांगती तलवार निर्माण झाली आहे. एवढेच नाही तर, देवेंद्र फडणवीस यांनी आठवड्यात दोनदा दिल्लीत जाऊन भाजपच्या (BJP) वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, राज्याच्या विधानसभेचा तिढा दिवसेंदिवस वाढताना पहायला मिळत आहे.
आता ही लढाई कायदेशी मार्गाकडे वळताना दिसत आहे. एकनाथ शिंदे गटाने मातोश्रीच्या नेतृत्वाला आव्हान दिल्यानंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Party Chief Uddhav Thackeray)
यांनी शिवसैनिकांना भावनिक आवाहन केले. शिंदे गटाने शिवसेने सोबत फारकत का घेतली हे दर्शवणारे स्टेटस,
वॉलपेपर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.माझं काय चुकलं?
असा सवाल विचारणारे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
वेळोवेळी पक्षप्रमुखांना सर्व गोष्टी सांगण्यात आल्या होत्या. पण त्याची दखल घेतली गेली नाही.
अशा आशयाचे फोटो व्हायरल होत आहेत.

Web Title :- Maharashtra Political Crisis | Now the formula will move from Bhagat Singh Koshyari from Raj Bhavan? maharashtra political crises

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :


Related Posts