IMPIMP

Maharashtra Political Crisis | मुख्यमंत्री ठाकरेंच्या समर्थनासाठी कोल्हापूरात शिवसैनिकांचा रस्त्यावर उतरून ‘एल्गार’

by nagesh
Maharashtra Political Crisis | shiv sainiks morcha in support of uddhav thackeray in kolhapur maharashtra political crisis

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Political Crisis | गेली तीन दिवस राज्यातील परिस्थितीला नवं वळण (Maharashtra Political Crisis) लागलं आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यातील राजकारणात मोठं वादळ निर्माण झालं आहे. शिंदे गटात सध्या चाळीसहून अधिक आमदार असल्याचा दावा करण्यात आला आहे. भाजपबरोबर (BJP) युती करा असं आवाहन शिंदे यांनी शिवसेनेला दिले, त्यानंतर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि शिवसेनेला (Shivsena) मोठा धक्का बसला, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) शिवसैनिक चांगलेच संतप्त झालेत. माजी शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) आज गुवाहाटीमध्ये दाखल झाल्याने कोल्हापूरात शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून एल्गार केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

एकनाथ शिंदेसह 40 ते 45 आमदारांनी बंड पुकारला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात सत्तापेच निर्माण झाला आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे काही ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) समर्थक शिवसैनिक आक्रमक होताना दिसत आहेत. बंडखोर आमदारांविरोधात घोषणा दिल्या जात आहेत. तसेच, शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले आहेत. उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील शिवसैनिक एकवटले आहेत. (Maharashtra Political Crisis)

राजेश क्षीरसागर आज गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील राज्य आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर (Rajendra Patil-Yadravkar) आणि जिल्ह्यातील एकमेव आमदार प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) देखील शिंदे गटात दाखल झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील एक माजी आणि एक आजी आणि एक अपक्ष असे ३ आमदार शिंदे गटाला मिळाले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिक चांगलेच संतप्त झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

दरम्यान, फुटलेल्या आमदारांची घरं फुटतील, असा इशाराच शिवसैनिकांनी दिला आहे.
पक्षप्रमुखांचा आदेश, पुन्हा नाही राजेश अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या आहेत. जे गेले ते कावळे, उरले ते मावळे अशाही घोषणा दिल्या आहेत.
कोल्हापूरातील दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली आहे.
दरम्यान, काल दिवसभरात राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे पण नॉट रिचेबल होते. अखेर ते शिंदे गटात पोहचले आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Maharashtra Political Crisis | shiv sainiks morcha in support of uddhav thackeray in kolhapur maharashtra political crisis

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | ‘महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करा’; भाजपचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना पत्र

Maharashtra Political Crisis | शिवसेनेच्या 40 बंडखोर आमदारांच्या PSO, पोलिस कॉन्स्टेबल, कमांडोंवर कारवाई !

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का, गटनेतेपदी अजय चौधरींना मान्यता; आमदारांवरील कारवाईबाबत ‘हा’ निर्णय

Related Posts