IMPIMP

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे गटाचा विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांच्याविरूध्दच अविश्वास प्रस्ताव, होणार कारवाई ?

by nagesh
Maharashtra Political Crisis | shivsena leader eknath shinde group has claimed vice president narhari zirwal has no authority to take action against the mla

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनMaharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर अनेकांनी त्यांच्या भूमिकेवर भाष्य केले. आता शिंदेविरोधात बोलणारे काही तासात त्यांच्या गोटात जात आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे गटाचे 34 आमदार अपात्र ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी काढलेल्या व्हीपनंतर बैठकीला उपस्थित नसल्याने या 34 आमदारांवर कारवाई (Vidhan Sabha Membership Canceled) करण्याची विनंती सुनील प्रभू यांनी केली होती. सुरुवातीला शिंदे गटाचे 12 आमदार अपात्र ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. 12 आमदारांवर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Assembly Vice President Narhari Zirwal) कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पण, आता अविश्वास प्रस्तावामुळे विधानसभा उपाध्यक्षांना अपात्रतेचे (Maharashtra Political Crisis) अधिकारच नाहीत, असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. यासंदर्भात दोन अपक्ष आमदारांनी विधानसभा उपाध्यक्षांना पत्र लिहलं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

गुरुवारी 12 आमदारांची आमदारकी रद्द करण्याची मागणी शिवसेनेने (Shivsena) केली होती. त्यानंतर हा आकडा आणखी वाढला आहे. शुक्रवारी आणखी पाच जणांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. यामध्ये सदा सरवणकर (Sada Sarvankar), संजय रायमुळकर (Sanjay Raimulkar), प्रकाश अबिटकर (Prakash Abitkar), बालाजी किणीकर (Balaji Kinikar), रमेश बोरनारे (Ramesh Bornare) या आमदारांना अपात्र करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. शिवसेना बंडखोरांवर कारवाई करत एकूण संख्याबळ कमी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. (Maharashtra Political Crisis )

उपाध्यक्षांना तो अधिकार नाही ?

आमदारांवर कारवाई होणार असल्याच्या वृत्तानंतर शिंदे गटाने उपाध्यक्षांना तो अधिकार नसल्याचा दावा केला जात आहे.
यासंदर्भात दोन अपक्ष आमदारांनी (Independent MLA) विधानसभा उपाध्यक्षांना पत्र लिहिले आहे.
महेश बालदी (Mahesh Baladi) आणि विनोद अग्रवाल (Vinod Agarwal) यांनी हे पत्र उपाध्यक्षांना दिले आहे.
एकनाथ शिंदे गटाने दोन दिवसांपूर्वीच अविश्वास प्रस्ताव विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात दाखल केला आहे.
विधानसभा नियम 179 अन्वये नरहरी झिरवाळ यांना हटविण्या संदर्भात यापूर्वीच पत्र दिले असल्याने आमदारांच्या अपात्रतेचे अधिकार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

यासाठी 2016 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निकालाचा दाखल पत्रात दिला आहे.
घटनेच्या दहाव्या परिशिष्टाप्रमाणे अध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव दाखल असेल तर त्यावर निर्णय होईस्तोवर त्यांना आमदारांच्या अपात्रतेचे अधिकार राहत नाहीत.
दोन दिवसांपूर्वीच शिंदे गटाने झिरवाळ यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.
त्यामुळे हा निर्णय न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Maharashtra Political Crisis | shivsena leader eknath shinde group has claimed vice president narhari zirwal has no authority to take action against the mla

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | ”बंडखोर आमदार अजूनही शिवसेनेचे आहेत, मुख्यमंत्रीही शिवसेनेचे आहेत, त्यामुळे…’ – अजित पवार

Best Stock | घसरणार्‍या बाजारात RIL मध्ये पैसे लावण्याचा सल्ला, 3400 रुपयांपर्यंत जाऊ शकतो स्टॉक

Atal Pension Yojana मध्ये दरमहिना 210 रुपये जमा करा, 10 हजार रुपये मंथली पेन्शन मिळवा

Related Posts