IMPIMP

Maharashtra Political Crisis | “काय झाडी, काय डोंगार, काय हाटील..! ‘एकनाथ शिंदे आमदार शहाजीबापूंना म्हणाले ‘Once More’

by nagesh
Maharashtra Political Crisis | shivsena leader eknath shinde is also a tree what a mountain said the mla once more maharashtra political crisis

मुंबई :सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Political Crisis | एकीकडे शिंदे गटातील बंडाळीमुळे राज्यात सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) पेच निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटातील सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील (MLA Shahajibapu Patil) चांगलेच चर्चेत आल्याचे दिसते. त्यांच्या शैलीदार भाषेणे संपूर्ण महाराष्ट्रात सोशल मिडीयावर चर्चेने धुमाकूळ घातला आहे. एका कार्यकर्त्याशी संवाद साधताना सोलापुरी ग्रामीण भाषेत “काय झाडी, काय डोंगार, काय हाटील..ओके मध्ये आहे सगळं,” असं म्हणत त्यांची ऑडीओ क्लीप समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

शहाजीबापू पाटील यांच्या वाक्याने सर्वानांच भुरळ पडली आहे. तसेच गाणं देखील निघालं आहे. तेच गाणं एकनाथ शिंदेंपर्यंतही (Eknath Shinde) पोहोचलं. त्यानंतर शिंदे गटातील आमदारांमध्ये त्या वाक्याची चर्चा झाली. आज सकाळी सगळे आमदार हॉटेलच्या लॉबीत आले असता, एकनाथ शिंदेंसह सर्वांनीच शहाजी बापूंचं मनापासून कौतुक केलं आहे. त्याचबरोबर, पुन्हा एकदा हा डायलॉग म्हणून दाखवण्याची विनंती केलीय. त्यानंतर, त्यांनीही हा डायलॉग बोलून दाखवला, त्यावेळी आमदारांमध्ये हशा पिकला. (Maharashtra Political Crisis)

त्यावेळी एकनाथ शिंदेंनी शहाजी पाटील यांना त्यांचं सुपरहिट वाक्य पून्हा एकदा म्हणून दाखवण्याची विनंती केली,
तसेच हे वाक्य किती व्हायरल झालं आहे आणि त्याची लोकांनी गाणी तयार केलीत हे देखील दाखवून दिलं.
त्यावेळी शहाजीबापूंनीही अगदी उत्सुकतेने ती गाणी पाहिली. तर, यावेळी नक्की काय गंमत घडली ती आता कॅमेऱ्यात कैद झालीय.
सध्या हाही व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. त्यामुळे सध्या शहाजीबापू पाटील महाराष्ट्रभर प्रकाशझोतात आले आहेत.

Web Title :- Maharashtra Political Crisis | shivsena leader eknath shinde is also a tree what a mountain said the mla once more maharashtra political crisis

Related Posts