IMPIMP

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे यांनी भाजपचा पाठिंबा असल्याचं केलं मान्य, जाहीर केली ही भूमिका

by nagesh
CM Eknath Shinde | CM eknath shinde government freezes funds approved by ncp leader chhagan bhujbal question to nashik collector

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनMaharashtra Political Crisis | शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Shivsena leader Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी राष्ट्रवादी (NCP)-काँग्रेस (Congress) सोबत सरकार नको अशी भूमिका घेत महाराष्ट्र हितासाठी निर्णय घेणे गरजेचे (Maharashtra Political Crisis) असल्याचे म्हटले आहे. बंडखोर आमदारांची मनधरणी सुरु असताना गुवाहाटीमधून एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांनी भाजपचा (BJP) पाठिंबा असल्याचे मान्य केलं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

एका राष्ट्रीय पक्षाचा (National Party) आपल्याला पाठींबा असल्याचे एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांना (Rebel MLA) सांगितलं. बंडखोरी करणाऱ्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांची एकमताने गटनेतेपदी निवड केली आहे. त्यानंतर आमदारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याचं सांगितलं. कुठे कमी पडणार नाही, असेही सांगितले. कुठेही काही लागलं तर कमी पडणार नाही, असा शब्द राष्ट्रीय पक्षाने दिला आहे. आता फक्त एकजुटीने राहयचं आहे. आपलं सुख, दु:ख सारखंच आहे. विजय आपलाच आहे, असे शिंदे म्हणाले.

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपला या प्रकरणात क्लिन चिट दिला असतानाच दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी मात्र राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याची कबुली दिली आहे.
दरम्यान एकनाथ शिंदे यांनी भाजपचं नाव घेतलं नाही. मात्र, त्यांनी राष्ट्रीय पक्षाचा उल्लेख केला आहे.
तसेच त्यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
त्यामुळे लवकरच एकनाथ शिंदे भाजपबरोबर सत्तास्थापनेचा दावा करु शकतात.

Web Title :- Maharashtra Political Crisis | shivsena leader eknath shinde says about bjp support maharashtra political crisis

हे देखील वाचा :

Ajit Pawar | ‘मी कधीच दुजाभाव केला नाही, निधीत काटछाट केली नाही’ अजित पवारांचे बंडखोर आमदारांना उत्तर

Sanjay Rathod | शिवसेनेचे आमदार संजय राठोड पत्नीचा शब्द धूडकावून गुवाहाटी दाखल

Nana Patole On Ajit Pawar | काँग्रेसचा उप मुख्यमंत्र्यांवर मोठा आरोप, म्हणाले – ‘अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना त्रास द्यायचे’

Sanjay Raut | संजय राऊतांचे सूचक ट्विट, म्हणाले – ‘गुलामी पत्कारण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ’

Related Posts