IMPIMP

Maharashtra Political Crisis | ‘आमदारांना किडनॅप करुन सुरतला नेलं’- संजय राऊत

by nagesh
Sanjay Raut | opposition mahamorcha sanjay raut on the 17th the mahamorcha will start no- one will be able to stop it sanjay raut

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Political Crisis | विधान परिषद निवडणुकीच्या (Maharashtra MLC Election-2022) निकालानंतर शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाॅट रिचेबल आहेत. शिंदे यांनी मोठं पाऊल उचलल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी घडामोड होताना दिसत आहे. त्यातच आता दुसरीकडे शिवसेना (Shivsena) आक्रमक होत शिंदे यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी बैठक घेतली आहे. यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला आहे. “एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतच्या ली मेरेडियन हॉटेलमध्ये असलेल्या शिवसेना आमदारांना अपहरण करुन त्याठिकाणी नेण्यात आले आहे. या सर्व आमदारांना गुजरात पोलीस आणि केंद्रीय पोलिसांच्या गराड्यात ठेवण्यात आले आहे. अनेक आमदारांनी हॉटेलमधून सुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याविरुद्ध दहशत आणि खुनी हल्ले झाल्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे,” असं राऊत म्हणाले. (Maharashtra Political Crisis)

पुढे राऊत म्हणाले, “अकोल्यातील आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) यांच्या पत्नीने ते बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांनी या सगळ्याविरोधात कठोर कारवाई करावी,” असं राऊत यांनी म्हटलं आहे. ‘अशाप्रकारचं वादळ हे शिवसेनेच्या आयुष्यात काही पहिल्यांदाच आलेले नाही. या सगळ्यातून शिवसेना पुन्हा उठून उभी राहिली आहे. एकनाथ शिंदे हे आमचे सहकारी आहेत. त्यांच्या मनात नाराजी असेल तर त्यांनी मुंबईला येऊन चर्चा करावी. सुरतला जाऊन त्यांच्याशी चर्चा करणे, हे पक्षशिस्तीत बसणारे नाही.’

दरम्यान, “एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या अनेक आमदारांनी आमच्याशी कोणत्या ना कोणत्या मार्गाने संपर्क साधला आहे.
हे सर्व आमदार सध्या प्रचंड घाबरले आहेत. त्यांना राज्यात पोटनिवडणुकीला सामोरे जायचे नाही.
आमदारांनी स्वत:चे हित पाहून निर्णय घ्यावा,” असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Maharashtra Political Crisis | shivsena leader sanjay raut slams eknath shinde and bjp

हे देखील वाचा :

Maharashtra Rains | राज्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा – IMD

Eknath Shinde | ‘दिघे साहेब असते तर गद्दारी…’ एकनाथ शिंदेंच्या बंडावर आनंद दिघेंच्या पुतण्याची प्रतिक्रिया

MNS On Uddhav Thackeray | ’21 जून वर्षातला सर्वात मोठा दिवस की, ‘वर्षा’तला शेवटचा दिवस ?’ – मनसे

Related Posts