IMPIMP

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रातील राजकीय पेचावर आज ‘सुप्रीम’ सुनावणी; आमदार अपात्रता याचिकेवर काय होणार? निर्णयाकडे लक्ष

by nagesh
Maharashtra Political Crisis | Shiv Sena president Kapil Sibal claims that Uddhav Thackeray is the only candidate till 2023, according to Election Commission documents.

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Political Crisis | राज्यात महिनाभरापासून सुरू असलेला सत्तासंघर्ष (Maharashtra Political
Crisis) आज निर्णायक टप्प्यावर येण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि
शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा (Chief
Justice N. V. Ramana) यांच्या 3 सदस्यीय खंडपीठासमोर आज (बुधवारी) सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narahari Ziraval) यांनी सुरू केलेल्या आमदारांच्या अपात्रता कारवाईला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले. त्यानंतर झालेल्या विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत व्हीप धुडकावल्याबद्दल दोन्ही बाजूंनी कोर्टात याचिका दाखल केल्या होत्या. या सर्व प्रकरणांची एकत्रित सुनावणी आज सरन्यायाधीश रमण्णा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे. (Maharashtra Political Crisis)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी पक्षात केलेल्या बंडामुळे राज्यात मोठी राजकीय घडामोडी घडल्या. त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं. मात्र त्याआधी शिवसेनेने बंडखोर आमदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली होती. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी करत अजय चौधरी (Ajay Chaudhary) यांची गटनेतेपदी निवड केली. त्याला आव्हान देत शिंदे गटाने शिवसेनेच्या कारवाईच्या विरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.
त्यानंतर शिवसेनेच्यावतीने देखील सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या होत्या. यावर आज फैसला आहे.
त्यामुळे निकाल कोणाच्या बाजुने लागतो? याकडे आख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष आहे.

Web Title :- Maharashtra Political Crisis | supreme court to hear today regarding to list plea filed by 14 shivsena mlas of uddhav thackeray camp against disqualification proceedings

हे देखील वाचा :

Shivsena MP Revolt | शिवसेनेच्या 12 खासदारांचा CM एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा

MP Rahul Shewale | युतीसाठी उद्धव ठाकरेंची PM नरेंद्र मोदींसोबत बंद दाराआड एक तास चर्चा, खासदार राहुल शेवाळेंचे गौप्यस्फोट

MP Rahul Shewale | राहुल शेवाळेंचा गौप्यस्फोट; म्हणाले – ‘उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यानुसारच आम्ही…’

Related Posts