IMPIMP

Maharashtra Political Crisis | ‘या’ 4 जणांची आमदारकी रद्द करा, शिवसेनेकडून विधानसभा उपाध्यक्षांकडे मागणी

by nagesh
 Maharashtra Political Crisis | take action taken on more 4 mla who are with eknath shinde demand from shiv sena to assembly deputy speaker

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनMaharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि समर्थक आमदार किंवा तो गट शिवसेना (Shivsena) पक्षादेशाचे उल्लंघन करत आहे. त्यामुळे 12 आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द (Vidhan Sabha Membership Cancel) करण्यात यावं अशी मागणी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Assembly Vice President Narhari Zirwal) यांच्याकडे गुरुवारी करण्यात आली होती. यानंतर आज आणखी चार आमदारांचे विधानसभा सदस्यत्व (Maharashtra Political Crisis) रद्द करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

शिवसेनेच्या बंडखोर 12 आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेने गुरुवारी केल्यानंतर आज (शुक्रवार) आणखी चार आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. यामध्ये आमदार सदा सरवणकर, प्रकाश आबिटकर, संजय रायमूलकर आणि रमेश बोरनारे यांच्या विरोधात देखील शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (Maharashtra Political Crisis)

सदा सरवणकर हे मुंबईच्या माहिम मतदारसंघातून (Mahim Constituency) विधानसभा आमदार आहेत. ते दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बोलताना दिसले होते. नंतर ते एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळाले. तर प्रकाश आबिटकर हे कोल्हापूरच्या राधानगरी मतदारसंघातून (Radhanagari Constituency) आमदार आहेत. संजय रायमूलकर हे बुलढाण्यातील मेहकर विधानसभा (Mehkar Constituency) मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडून गेले आहेत. तर रमेश बोरनारे औरंगाबादच्या वैजापूर मतदारसंघाचे (Vaijapur Constituency) प्रतिनिधीत्व करतात.

शिवसेनेकडून सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आलेले आमदार…

1. एकनाथ शिंदे (Eknath Shinde)
2. तानाजी सावंत (Tanaji Sawant)
3. संदीपान भुमरे (Sandipan Bhumre)
4. संजय शिरसाठ (Sanjay Shirsath)
5. अब्दुल सत्तार (Abdul Sattar)
6. भरत गोगावले (Bharat Gogavale)
7. प्रकाश सुर्वे (Prakash Survey)
8. अनिल बाबर (Anil Babar)
9. बालाजी किनीकर (Balaji Kinikar)
10. यामिनी जाधव (Yamini Jadhav)
11. लता सोनवणे (Lata Sonawane)
12. महेश शिंदे (Mahesh Shinde)
13. सदा सरवणकर (Sada Sarvankar)
14. प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar)
15. संजय रायमूलकर (Sanjay Raymoolkar)
16. रमेश बोरनारे (Ramesh Bornare)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Maharashtra Political Crisis | take action taken on more 4 mla who are with eknath shinde demand from shiv sena to assembly deputy speaker

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | मुख्यमंत्री ठाकरेंच्या समर्थनासाठी कोल्हापूरात शिवसैनिकांचा रस्त्यावर उतरून ‘एल्गार’

Maharashtra Political Crisis | ‘महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करा’; भाजपचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना पत्र

Maharashtra Political Crisis | शिवसेनेच्या 40 बंडखोर आमदारांच्या PSO, पोलिस कॉन्स्टेबल, कमांडोंवर कारवाई !

Related Posts