IMPIMP

Maharashtra Political Crisis | देवेंद्र फडणवीस पुन्हा ‘अ‍ॅक्टिव्ह’ ! विधान परिषदेवर भाजपचा सभापती होणार ? मविआला पुन्हा जोरदार धक्का ?

by nagesh
Maharashtra Politics News | thackeray Group mp priyanka chaturvedi tell why she meet hm amit shahmaharashtra

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत शिवसेनेला (Shivsena) मोठा धक्का दिला. या बंडखोरीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. राजकीय सत्तासंघर्ष शिगेला गेला अन् महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) ठाकरे सरकार (Thackeray Government) कोसळले. शिंदे-फडणवीस यांचे नवे सरकार (Shinde-Fadnavis Government) आले. तत्पूर्वी सुरुवातीला राज्यसभा निवडणूक आणि (Maharashtra Political Crisis) त्यानंतर झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत (Legislative Council Elections) महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिल्यानंतर आता भाजपचे पुढील लक्ष्य विधान परिषदेच्या सभापतीपद (Speaker) असल्याचे सांगितले जात आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

शिंदे सरकारमध्ये सर्वाधिक मलाईदार खाते भाजपने (BJP) आपल्याकडे ठेवले आहे. आता भाजपने विधान परिषदेच्या सभापती निवडणुकीसाठी हालचाल सुरु केली आहे.
मंत्रिमंडळात (Cabinet) संधी न मिळालेल्या माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांची वर्णी सभापतीपदी लागणार अशी चर्चा रंगली आहे.
तसेच राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादीही नव्याने सादर केली जाणार आहे. (Maharashtra Political Crisis)

उद्या बुधवारपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन (Rainy Season) सुरु होत आहे. शिंदे सरकारचे हे पहिले पावसाळी अधिवेशन आहे.
आता विधान परिषदेचा सभापती बसवण्यासाठी भाजपकडून हालचाली सुरु झाल्या आहेत.
विधानपरिषदेत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी या सभागृहाच्या सभापती पदावर आपल्या पक्षाचा नेता बसावा यासाठी भाजपने हालचाली सुरु केल्या आहेत.

सभागृहाच्या कामकाजावरील पकड घट्ट करण्यासाठी सभापतिपद मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे.
या पदासाठी विधानपरिषद आमदार राम शिंदे यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे.

सद्यस्थितीत विधानपरिषदेत भाजपकडे 24 तर शिवसेनेकडे 11 आणि राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसकडे (Congress)
प्रत्येकी 10 जागा आहेत.
तसच 16 जागा रिक्त आहेत. यामध्ये राज्यपाल नियुक्त (Governor Appointed) 12 जागांचा समावेश आहे.
विधान परिषदेचा सभापती निवडण्यापूर्वी या जागांची नियुक्ती झाल्यास भाजपचे संख्याबळ महाविकास आघाडी पेक्षा जास्त होईल आणि भाजपला विधान परिषदेतही बुहमत सिद्ध करता येईल.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : –  Maharashtra Political Crisis | what is bjp devendra fadnavis strategy for ram shinde in vidhan parishad legislative council speaker election

हे देखील वाचा :

Ringworm | खाजेमुळे त्रस्त झाला आहात का, या टिप्सद्वारे दूर करा Fungal Infection

Gold Price Today | सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या किती झाला 10 ग्रॅम सोन्याचा दर ?

Aadhaar Seva At Pune Railway Station | पुणे रेल्वे स्टेशनवर आधार सेवा केंद्र; रेल्वे स्टेशनवर आधार कार्डबरोबर दुरुस्तीही करता येणार

Related Posts