IMPIMP

Maharashtra Politics | शिंदे-फडणवीस सरकारने लावला ठाकरे सरकारच्या काळात मंजूर झालेल्या विकासकामाला थांबवण्याचा धडाका

by nagesh
Maharashtra Politics | aditya thackeray eknath shinde government suspension of aditya thackerays dream projects

मुंबई: सरकारसत्ता ऑनलाईन  – Maharashtra Politics | गेल्या 15 महिन्यांत मंजूर झालेल्या निविदा आणि कार्यादेश काढूनही सुरू न झालेल्या कामांना स्थगिती देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे सरकारने (Shinde Fadnavis Government) घेतला. यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. यातील बहुतेक प्रकल्प उद्धव ठाकरे सरकारच्या (Uddhav Thackeray) काळात मंजूर झाले होते. यात सर्वात मोठा फटका आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) मंत्री होते त्या पर्यटन मंत्रालयाला (Tourism Ministry) बसला आहे. (Maharashtra Politics)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

तत्कालीन सरकारने प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत 38,170 कोटी 71 लाख रुपयांच्या कामांना मान्यता दिली होती. शिवाय, 21,480 कोटी रुपयांच्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाशी संबंधित प्रशासकीय कामांना मंजुरी ठाकरे सरकारने दिली होती. पण शिंदे सरकारने या दोन्ही कामांना स्थगिती दिली आहे. (Maharashtra Politics)

एवढेच नव्हे तर, नगरविकास खात्याने मंजूर केलेल्या 941 कोटी रुपयांच्या कामांना शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे. यापैकी फक्त बारामती (Baramati) नगर परिषदेला विकासकामांसाठी 245 कोटींची रक्कम मंजूर केली होती. त्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनाही शिंदे सरकारने धक्का दिला आहे. त्यामुळे ठाकरे सरकारच्या काळात मंजूर झालेल्या विकासकामाला थांबवण्याचा धडाका शिंदे-फडणवीस सरकारने (Sihnde-Fadnavis Government) लावला आहे, असे म्हणणे वावगे ठरणावर नाही.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Maharashtra Politics | aditya thackeray eknath shinde government suspension of aditya thackerays dream projects

हे देखील वाचा :

Pune Temperature | पुण्यात ‘या’ हंगामातील सर्वात कमी किमान तापमान

Sanjay Raut | ‘राहुल गांधींच्या ‘त्या’ विधानामुळे महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता’ – संजय राऊत

Pune Crime | शेजारच्याने गुप्तांगाला इजा करुन ज्येष्ठाचा केला खून; पत्नीसह सामान घेऊन झाला फरार

Related Posts