IMPIMP

Maharashtra Politics | महाविकास आघाडीच्या फुटीच्या वक्तव्यावर काँग्रेसच्या जयराम रमेशांची प्रतिक्रिया; म्हणाले, “सावरकरांबाबत वेगवेगळी मते आहेत, पण…”

by nagesh
Maharashtra Politics | bharat jodo yatra differences between congress and shivsena over v d savarkar what will happen to maviya congress clearly said

शेगाव : सरकारसत्ता ऑनलाईन  – Maharashtra Politics | काँग्रेस खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांची भारत जोडो पदयात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या महाराष्ट्रात आहे. यावेळी एकेठिकाणी भाषणात राहुल गांधी यांनी वि. दा. सावरकर (V. D. Savarkar) यांच्याविषयी भाष्य केले. त्यामुळे राज्यात भाजप (BJP) विरुद्ध काँग्रेस (INC) आणि महाविकास आघाडी (MVA) वाद सुरु आहेत. शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट) (Shivsena) राहुल गांधी यांच्या वक्तव्याला असहमती दर्शविली आहे. त्याबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे. राहुल गांधींच्या विधानामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते, असे संजय राऊत म्हणाले होते. (Maharashtra Politics)

संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसकडून त्यांचे मत मांडण्यात आले आहे. ‘महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि काँग्रेसची सावरकरांबाबत वेगवेगळी मते आहेत, पण त्याचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही’, असे मत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी सांगितले. (Maharashtra Politics)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

‘सावरकारांच्या मुद्दयावर महाराष्ट्रातील काही पक्ष आणि संघटना विनाकारण वाद वाढवत आहेत.
सावरकरांच्या बाबतीत जे ऐतिहासिक सत्य आहे, ते नाकारता कसे येईल?’
असा प्रश्न जयराम रमेश यांनी उपस्थित केला. शिवाय, ‘भारत जोड़ो यात्रेचा एवढा एकच मुद्दा नाही.
यावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. काँग्रेसने कधीही इतिहासाची मोडतोड केलेली नाही.
द्विराष्ट्रवादाचा सिंद्धात सावरकरांचीच मांडला.
१९४२ च्या भारत छोडो, चले जावच्या चळवळीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) विरोध केला होता.
जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी (Shyamaprasad Mukharji) बंगालच्या फाळणीचे मोठे समर्थक
होते आणि त्यांनी मुस्लीम लिगशी युती करून सरकारही स्थापन केले होते. हे ऐतिहासिक सत्य आहे.’
जयराम रमेश शेगाव (Shegaon) येथे पत्रकारांशी बोलत होते.

Web Title :- Maharashtra Politics | bharat jodo yatra differences between congress and shivsena over v d savarkar what will happen to maviya congress clearly said

हे देखील वाचा :

Sachin Vaze | सचिन वाझेंना जामीन मंजूर; पण, …

Shraddha Walker Murder Case | आफताबने यापूर्वी 2020 मध्ये देखील श्रद्धाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता; तपासात धक्कादाय माहिती उघड

Ahmednagar Crime | अहमदनगरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना; अनाथ तरुणीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत ५ जणांनी केला बलात्कार

Related Posts