IMPIMP

Maharashtra Politics | जयंत पाटील यांच्या टीकेला बावनकुळेंचे प्रत्युत्तर; म्हणाले – ‘दर 15 दिवसांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्लीला जावे’

by nagesh
Chandrashekhar Bawankule | chandrashekhar bawankule replied to supriya sule allegation on shinde government in jintendra awhad case pune news

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Politics | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) दिल्लीला जरी जात असले तरी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशिवाय त्यांना दिल्लीत अपॉइमेंट मिळणे कठीण आहे, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली होती. यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP Maharashtra State
President Chandrashekhar Bawankule) यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले की, प्रत्येक महिन्याला किंवा 15 दिवसाला माननीय मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला
गेले पाहिजे. महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी केंद्राची मदत लागेल. केंद्राच्या मदतीशिवाय कुठलेही राज्य पुढे जाऊ शकत नाही. (Maharashtra Politics)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत प्रचंड वजन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांनी केवळ आणि केवळ महाराष्ट्राच्या विकासासाठी बैठका घेतलेल्या आहेत. जे जे प्रकल्प आणि योजना एकनाथ शिंदे मागतील ते मोदींनी देऊ असे सांगितले आहे. यासंदर्भातील माहिती शिंदे आणि फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. (Maharashtra Politics)

राष्ट्रवादीवर टीका करताना बावनकुळे म्हणाले की, केंद्राची मदत यांनी घेतली नाही. महाराष्ट्राची अडीच वर्ष खराब केली. अडीच वर्ष महाराष्ट्र विकासापासून वंचित ठेवला. केंद्र जोपर्यंत पूर्ण मदत करत नाही तोपर्यंत राज्य पुढे जाऊ शकत नाही. एकनाथ शिंदे हे विकासकामे करणारे मुख्यमंत्री आहेत. विकास मागणारा मुख्यमंत्री जर पंतप्रधानांना, केंद्रीय नेतृत्वाला भेटत असेल तर यांना कुठे तोंड फुटलेय? अडीच वर्षात यांनी काय केले? मोदींनी त्यांना थांबवले होते का?

बावनकुळे पुढे म्हणाले, मी तर असे म्हणेन की शिंदे आणि फडणवीस मोदींना भेटून
महाराष्ट्राच्या विकासाची योजना तयार करत आहेत याचा आम्हाला आनंद आहे.
मला वाटते त्यांनी आता जरा शांत बसले पाहिजे. शिंदे आणि फडणवीस यांच्या विकासाच्या बुलेट ट्रेनचा आराखडा बघितला पाहिजे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Maharashtra Politics | bjp chandrashekhar bawankule replied ncp jayant patil over criticism on eknath shinde and devendra fadnavis about delhi visit

हे देखील वाचा :

Pune ACB Trap | ग्रामविकास अधिकाऱ्याकडून 30 हजार रुपये लाच घेताना सहायक लेखा परीक्षा अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

Pune Police Inspector Transfer | पुण्यातील 7 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या; विमाननगर, चंदननगर, सहकारनगर बिबवेवाडी, फरासखाना आणि खडकी पो.स्टे. मध्ये नियुक्त्या

Chandigarh University MMS Scandal | विद्यार्थीनींचा बाथरुममध्ये चोरून व्हिडीओ काढण्याचा धक्कादायक प्रकार चंदीगढनंतर आता IIT Mumbai त उघड! कर्मचार्‍याचा उद्योग

Related Posts