IMPIMP

Maharashtra Politics | पेंग्विन आणल्याने राज्याचा विकास होतो का?, अजित पवारांच्या प्रश्नाला बावनकुळेंचा रोखठोक सवाल

by nagesh
Ajit Pawar | send ajit pawar in pakistan says bjp former mla narendra pawar over statement sambhaji maharaj is not dharmveer

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Politics | भारतातून 70 वर्षापूर्वी नामशेष झालेले चित्ते (Cheetah) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM
Narendra Modi) यांच्या वाढदिवसाला नामिबियातून (Namibia) भारतात आणले. मध्य प्रदेशाच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये (Kuno National Park)
8 चित्ते आणण्यात आले आहेत. पंतप्रधानांच्या वाढदिवसादिवशी या चित्त्यांना अभयारण्यात (Sanctuary) सोडण्यात आले. परंतु या वरून विरोधकांनी
सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड (Maharashtra Politics) उठवली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्य सरकारवर
(State Government) टीका करताना यामुळे रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का, असा सवाल करत निशाणा साधला आहे. याला भाजप (BJP)
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी पलटवार करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना, बऱ्याचदा दुर्दैवाने, तुमच्या माझ्या देशात, महाराष्ट्रात जे महत्त्वाचे प्रश्न असतात. महागाईचे (Inflation), बेरोजगारीचे (Unemployment), कायदा सुव्यवस्था (Law and Order) याला व्यवस्थितपणे बाजूला ठेवून तिसरेच प्रश्न पुढे आणतात. चित्ते आले ठीक आहे, चित्ते वाढावे हे ठीक आहे… पण यातून रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का? याऐवजी वेदांताचे (Vedanta-Foxconn project) काय होणार ते सांगा? अशी विचारणा करत त्यांनी राज्य सरकारवर (Maharashtra Politics) टीका केली. याला चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

पेंग्विन आणल्याने विकास होतो का?

पेंग्विन (Penguin) आणल्याने राज्याचा विकास होतो का? मुंबई, महाराष्ट्राची काय स्थिती आहे? राज्याचा विकास नव्याने सुरु आहे. राज्यात आताच नवे सरकार आले आहे. त्यांना जरा स्थिर होऊ द्या, असे सांगत सध्या विरोधक बावचळलेल्या स्थितीत आहेत, म्हणून असे आरोप करत आहेत, अशा शब्दात बावनकुळे यांनी पलटवार केला आहे. तसेच आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या पुढाकारातून मुंबईत राणीच्या बागेत (Rani Bagh in Mumbai) पेंग्विन आणण्यात आले होते. तेव्हापासून पेंग्विन साठी लागलेल्या खर्चावरुन भाजपकडून शिवसेनेवर टीका करण्यात येत आहे.

Web Title :- Maharashtra Politics | bjp leader chandrashekhar bawankule replied ncp ajit pawar criticism over vedanta foxconn project and cheetah in india

हे देखील वाचा :

NCP Supriya Sule On Shinde-Fadnavis Govt | बाळासाहेब शिवाजी पार्कवरुन शरद पवारांवर टीका करायचे पण…, सुप्रिया सुळेंचा दसरा मेळाव्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा

Maharashtra Politics | पत्राचाळ प्रकरणी अतुल भातखळकर यांचा गंभीर आरोप, म्हणाले – ‘शरद पवार हेच खरे रिंग मास्टर…’

Beed ACB Trap | 1500 रुपये लाच घेताना सहायक सरकारी महिला वकील अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Related Posts