IMPIMP

Maharashtra Politics Crisis | तारीख निश्चित, महाराष्ट्रातील शिंदे-ठाकरे वादावर ‘या’ तारखेला होणार सुनावणी

by nagesh
Maharashtra Political Crisis | supreme court will decision tomorrow on the dispute between shiv sena and shinde group rahul shewale and anil desai going to delhi

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Politics Crisis | शिवसेनेचे (Shivsena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी (MLA) बंड केल्यामुळे पक्षात फूट पडली आहे. शिंदे गटाने (Shinde Group) भाजपच्या (BJP) मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. यानंतर शिंदे विरुद्ध ठाकरे गट (Thackeray Group) हे आमने सामने आले आहेत. दोन्ही गटांनी शिवसेना आपली असल्याचा दावा केला आहे. अखेर हा वाद सुप्रीम कोर्टात (Supreme Court) पोहोचला. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील वादावर मंगळवारी घटना पीठासमोर (Constitution Bench) सुनावणी झाली. यावेळी घटनापीठाने खरी शिवसेना कोणाची, पक्षाचे निवडणूक चिन्ह (Election Symbol) कोणाचे यावर निर्णय घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला दिले. आज शिंदे गटावरील अपात्रतेच्या कारवाईवरील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची तारीख (Maharashtra Politics Crisis) निश्चित करण्यात आली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

शिंदे-भाजप सरकार (Shinde-BJP Government) महाराष्ट्रात स्थापन झाल्यानंतर (Maharashtra Politics Crisis) शिंदे यांनी शिवसेनेवर दावा सांगण्यास सुरुवात केली. स्वत:चे पदाधिकारी नेमले.
यावरुन खरी शिवसेना कोणाची? धनुष्य बाण (Dhanushya Ban Symbol) कोणाचा? असा वाद सुरु झाला. ठाकरे गटाने शिंदे सुरतला गेलेले असतानाच 16 आमदारांना अपात्रतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव दिला. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Assembly Vice President Narhari Zirwal) यांच्यावर आधीच अपात्रतेचा प्रस्ताव पेंडिंग असताना ते कारवाई करु शकत नाही, अशी याचिका शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात दाखल केली.
यानंतर ठाकरे गटाने देखील वेगवेगळ्या पाच ते सहा याचिका दाखल केल्या.

या सर्व याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाने वेगळे घटनापीठ स्थापन केले होते.
यानुसार मंगळवारी कोर्टाने आपल्याकडे सुनावणीसाठी योग्य याचिका कोणत्या आणि निवडणूक आयोगासाठी (Election Commission) कोणत्या याची काल वाटणी केली.
आता शिंदे गटाच्या आपात्रतेवर व अन्य याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात 1 नोव्हेंबरपासून सुनावणी होणार आहे.
यामुळे शिंदे आणि ठाकरे गटाला एकाच वेळी दोन ठिकाणी युक्तीवाद, पुरावे, दावे-प्रतिदावे करावे लागणार आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Maharashtra Politics Crisis | supreme court will hear disqualification petition on eknath shinde group vs uddhav thackeray shivsena from 1 november Marathi News

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | ‘अनाथांचे नाथ एकनाथ, तुम्ही दयाळू आहात’, पोलीस निरीक्षकाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली ‘ही’ मागणी

Punit Balan Group | पुनीत बालन ग्रुपच्या शिवांश ‘रौप्य’ तर सोनिया ‘कांस्य’ पदकाची मानकरी; तिसरी माऊंट एव्हरेस्ट चषक खुली तायक्वांदो स्पर्धा

Maharashtra Politics | शिवसेनेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे चुकीचा संदेश, फेरविचार करावा’; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे मत

Related Posts