IMPIMP

Maharashtra Politics | देवेंद्र फडणवीस पुण्याचे पालकमंत्री ?, चंद्रकांत पाटलांचे सूचक वक्तव्य

by nagesh
Chandrakant Patil | BJP leader chandrakant patil on demand of brahmin federation to make devendra fadnavis mp from pune

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Politics | राज्यातील सत्तांतरानंतर भाजप-शिंदे गटाचं सरकार (BJP-Shinde Group Government) महाराष्ट्रात आले. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यात सर्वाधिक जागा जिंकून देखील शिवसेनेच्या (Shivsena) खेळीमुळे फडणवीस (Maharashtra Politics) विरोधी पक्षनेते झाले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Govt) आल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री झाले. पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा (NCP) बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे अजित पवार यांनी पुण्याचे पालकमंत्री (Guardian Minister of Pune) म्हणून जबाबदारी घेतली होती. मात्र राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस पुण्याचे पालकमंत्री व्हावे अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

भाजप (BJP) कार्यकर्त्यांच्या याच मागणीला दुजोरा देत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एका कार्यक्रमात संकेत दिले आहेत. पुण्यातील एका शिष्टमंडळाला भेट देताना पाटलांनी तुम्ही आता पुढे व्हा अन् तुमच्या पालकमंत्र्यांशी बोलून घ्या असं सांगत फडणविसांकडे इशारा केला. ते पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पुण्यात अजित पवारांचा दबदबा आहे. त्यालाच सुरुंग लावण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे पुण्याचे पालकमंत्री होणार हे आता जवळपास निश्चित असल्याचे बोलले जात आहे. (Maharashtra Politics)

अलीकडेच पुण्यातील एका खासगी संस्थेच्या कार्यक्रमात भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने याला दुजोरा दिला.
आधीचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार होते. आत्ताच्या सरकारमध्ये फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत.
त्यामुळे त्यांनीच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होणे योगायोग साधल्यासारखे होईल असे सांगत या कार्यकर्त्यांनी पुणे महापालिका निवडणूक (Pune Municipal Election), पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे वर्चस्व असे मुद्दे फडणवीस यांच्यापुढे मांडले.
तेव्हा बरोबर आहे तुमचे अशा अर्थाने नेहमीसारखी मान हलवत त्यांनी मूक संमती दिली, असे पदाधिकाऱ्याने सांगितले.

कोल्हापूरातून पुण्यात आलेले व कोथरुड मतदारसंघाचे (Kothrud Constituency) आमदार चंद्रकांत पाटील अजूनही पुण्यात चाचपडत आहेत.
त्यांना जिल्ह्याने किंवा पुणे शहरानेही स्वीकारलेले दिसत नाही.
त्यामुळे भाजपच्या पुणे गोटातील पाटील यांच्याबद्दल नाराजीचा सुप्त प्रवाह आहेच. पुणे शहरावरचे वर्चस्व कमी केले म्हणून खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) हेही पाटील यांच्या विरोधातच असल्याचे दिसते.
त्यामुळे फडणवीस यांनी पुण्याचे पालकमंत्री व्हावे यासाठी आग्रह केला जात आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : –  Maharashtra Politics | devendra fadnavis will be guardian minister of pune an indicative statement by bjp chandrakant patil

हे देखील वाचा :

Former MLA Baburao Pacharne Passed Away | शिरुर-हवेली मतदारसंघाचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे निधन

Panshet Dam | पानशेत धरण 100 टक्के भरले ! नदीत 7376 क्युसेक्सचा विर्सग सुरु, मुळशीही 88 टक्के भरले

Rain in Maharashtra | राज्यात आज ‘येलो अलर्ट’ ! पुणे, मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता

Related Posts