IMPIMP

Maharashtra Politics | शिंदे-फडणवीस सरकारची वक्रदृष्टी गोरगरीबांच्या जेवणावर? बंद होऊ शकते शिवभोजन थाळी योजना

by nagesh
Maharashtra Politics | eknath shinde led maharashtra government may be close shiv bhojan thali scheme which is started by maha vikas aghadi

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन Maharashtra Politics | राजकीय द्वेषातून शिंदे- फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government)
मागील मविआ सरकारचे (MahaVikas Aghadi Government) बहुतांश निर्णय रद्द करण्याचा सपाटा लावला आहे. मात्र, या राजकारणात राज्याच्या
विकासाला झळ पोहोचत आहे. आता राज्य सरकारची वक्रदृष्टी गोरगरिबांच्या जेवणावर पडणार आहे. कारण लवकरच राज्यातील शिवभोजन थाळी
(Shivbhojan Thali) योजना बंद करण्याचा विचार शिंदे-फडणवीस सरकार करू शकते (Maharashtra Politics).

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय शिंदे-फडणवीस सरकारने व्यक्त केला आहे. ही योजना बंद झाल्यास गरजूंना मोठा फटका बसू शकतो. या योजनेतंर्गत राज्यातील गरीब जनतेला 10 रुपयांत जेवण मिळते. कोरोना काळात शिवभोजन थाळी 5 रुपयात मिळत होती.

महाविकास आघाडी सरकारने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वात शिवभोजन थाळी सुरू केली होती. सध्या राज्यात एक लाख 88 हजार 463 इतक्या थाळ्यांची विक्री होते. शिवभोजन थाळीसाठी विविध ठिकाणी केंद्र आहेत. ही केंद्र चालवणार्‍यांना राज्य सरकारकडून मदत दिली जाते. (Maharashtra Politics)

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
यांच्या नेतृत्वातील सरकार राज्यात आल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातील अनेक निर्णयांना स्थगिती दिली आहे.
शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करत सरकारने योजनेचा आढावा घेण्याचे ठरवले आहे.
यानंतर योजना चालू ठेवायची की बंद करायची याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

शिवभोजन थाळीची संख्या दोन लाखांपर्यंत नेण्यासाठी ठाकरे सरकारने प्रस्ताव आणला होता.
हा प्रस्ताव शिंदे सरकारसमोर आल्यावर त्यांनी यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही.
उलट, ही योजना बंद करण्याच्या दृष्टीने विचार सुरू केल्याचे समजते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Maharashtra Politics | eknath shinde led maharashtra government may be close shiv bhojan thali scheme which is started by maha vikas aghadi

हे देखील वाचा :

Anil Deshmukh | अनिल देशमुखांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, मुंबई हायकोर्टाला दिले आदेश, म्हटले – तातडीने सुनावणी घेत निर्णय…

Pune Crime | किरकोळ वादातून रिक्षा चालक तरुणाचा निर्घृण खून, हडपसर परिसरातील घटना

Tanaji Sawant | चौफेर टीकेनंतर मंत्री तानाजी सावंतांनी मागितली मराठा समाजाची माफी, म्हणाले – माझं विधान खटकलं असेल तर…

Pune Crime | एटीएम मशीनवर दरोड्याचा प्रयत्न, परप्रांतीय टोळीला कोंढवा पोलिसांकडून अटक; 5 गुन्हे उघड

Related Posts