IMPIMP

Maharashtra Politics News | जागावाटपाची चर्चा मीडियात करण्याची गरज नाही, भुजबळांनी टोचले नेत्यांचे कान

by nagesh
Maharashtra Politics News | There is no need to discuss seat sharing in the media, Bhujbal pierced the ears of the leaders

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Politics News | पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवरुन (Pune Lok Sabha Bypoll Election) अजित पवार (Ajit Pawar) आणि संजय राऊत (Sanjay Raut) आमने सामने आले आहेत. तर काँग्रेसने (Congress) ही जागा सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यावरुन महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) वाद चव्हाट्यावर आले आहेत. यावर राष्ट्रवादीचे (NCP) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आघाडीतील (Maharashtra Politics News) नेत्यांचे कान टोचले आहेत. जागावाटपाची चर्चा मीडियात करण्याची गरज नाही, अशा शब्दात भुजबळ यांनी नेत्यांना सुनावलं आहे.

ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे, कसेल त्याचीच जमिन या प्रमाणे, जो जिंकेल त्याची जागा. हे सूत्र ठरले तर ‘कसबा’ प्रमाणे पुणे लोकसभा पोटनिवडणुक महाविकास आघाडीला सहज जिंकता येईल. (Maharashtra Politics News) जागांचा आकडा वाढवण्याचा हट्ट अनाठायी आहे. जिंकेल त्याची जागा याच सूत्राने महाराष्ट्र आणि देश जिंकता येईल. संविधान (Constitution) आणि लोकशाही (Democracy) वाचवण्यासाठी प्रत्येकाने थोडा थोडा त्याग करावाच लागेल असे म्हटले आहे. संजय राऊतांच्या या ट्विट बाबत पत्रकार परिषदेत भुजबळ यांना विचारण्यात आले. यावर त्यांनी भूमिका स्पष्ट केली.

छगन भुजबळ म्हणाले, कोण कुठे निवडून येईल…कोण कुठला पक्ष ताकदवर आहे…
त्यांच्याकडे कोणता उमेदवार आहे…आम्ही तेच सांगत आहोत. मात्र ते दुसऱ्या भाषेत सांगत आहेत.
पण आगोदर जी सुरुवात झाली 19 जागा आम्ही अगोदर घेणार मग बाकीच्या चर्चा.
यानंतर उलट सुटल चर्चा सुरु झाल्या आहेत. मला असं वाटतं की ही चर्चा थांबवली पाहिजे.
जागावाटपाची चर्चा मीडियामध्ये करण्याची गोष्ट नाही.
तिन्ही घटक पक्षांना विश्वासात घेऊन याबाबत आम्ही चर्चा करु.
तसेच कर्नाटकमध्ये भाजपचे (BJP) जे पाणीपत झाले आहे, त्यावरुन ते निवडणूक घेणार की नाही?
हे आधी स्पष्ट होऊ द्या, असेही भुजबळ म्हणाले.

Web Title : Maharashtra Politics News | There is no need to discuss seat sharing in the media,
Bhujbal pierced the ears of the leaders

Related Posts