IMPIMP

Maharashtra Rain Update | राज्यात पावसाचे थैमान ! आगामी 2 दिवस पावसाचा जोर कायम; अनेक जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’

by nagesh
Maharashtra Rain Update | Heavy rain in the state Heavy rain will continue for the next 2 days Many districts on red alert

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Rain Update | गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने (Maharashtra Rain Update) धुमाकूळ घातला आहे. राज्यासाठी पुढील 48 तास महत्त्वाचे आहेत. कोकण (Konkan) आणि मध्य महाराष्ट्रात (Central Maharashtra) अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच विदर्भ (Vidarbha) आणि मराठवाड्यातही (Marathwada) मुसळधार सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (Heavy To Very Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे. तर काही भागात पावसाची रिपरिप सुरूच असल्याचं चित्र आहे.

कोकणमध्ये मागील चार दिवसांपासून धो धो पाऊस कोसळत आहे.
वाढत्या पावसाचा अंदाज पाहता हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department-IMD)
पालघर, नाशिक, पुणे या जिल्ह्यांना रेड अलर्ट (Red Alert) देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा,
कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे.
तर नंदूरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, बुलढाणा, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे. (Maharashtra Rain Update)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

राज्यभर पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांच्या आणि धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.
येत्या दोन दिवसात पावसाचा हा जोर कायम राहण्याची शक्यता असून अनेक ठिकाणच्या शाळा बंद (School Closed) करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

Web Title :- Maharashtra Rain Update | Heavy rain in the state Heavy rain will continue for the next 2 days Many districts on red alert

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Rain in Pune | अतिवृष्टीचा पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील गडकिल्ले, पर्यटनस्थळ परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

Aba Bagul | ज्ञान, व्यवहार, विवेक, आत्मविश्वास आई-वडील व गुरूंशिवाय मिळत नाही – आबा बागुल

Related Posts