IMPIMP

Maharashtra Rain Update | राज्यात सर्वत्र पावसाची जोरदार बॅटींग; मुंबईसह पुण्यात दिवसभर रिपरिप

by nagesh
Rain In Maharashtra | it will rain in maharashtra between 11th and 14th december due to west bengal cyclone

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Rain Update | राज्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून सर्वदूर पाऊस (Maharashtra Rain Update) सक्रिय झाला आहे. मुंबई (Mumbai), पुणे (Pune), कोल्हापूर (Kolhapur) या ठिकाणी सतत पावसाची रिपरिप दिसून येते. मुंबईत सकाळपासून रिमझिम पाऊस सुरु आहे. त्याचबरोबर मुंबईला पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. काल पुण्यासह मुंबईत पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यावर पाणी साचले होते.

बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील काही भागांत पाणी साचल्याने (Water Lodging) नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. काल दिवसभर कोसळणाऱ्या पावसामुळे सायनच्या रस्त्यांवर पाणीच पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. अंधेरी, घाटकोपर, चेंबूर, धारावी, दादर, वडाळा, पनवेलमध्येही लोक साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत घर गाठताना दिसले. पण संध्याकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यामुळे साचलेले पाणी ओसरले. पण रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे पुन्हा सखल भागांत पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. (Maharashtra Rain Update)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मुंबईत जोरदार सरी –

मुंबईच्या मलबार हिल परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले.
वाहनचालकांना त्यातूनच मार्ग काढावा लागत आहे. मुंबईच्या मरोळ परिसरात पावसाची संततधार सुरु आहे.
याठिकाणीही पावसाचे पाणी साचल्याचे दिसून येत आहे. कुर्ल्यात प्रचंड पाऊस झाला.
त्यामुळे पहाटे सखल भागात पाणीच पाणी साचलं आहे. रस्त्यांवरही पाणी साचलं आहे.
त्यामुळे नागरिकांना सावधगिरीने रस्त्यावरून जावे लागत आहे. वाहनचालकांनाही संथगतीनं वाहने पुढे न्यावी लागत आहेत.

Web Title :- Maharashtra Rain Update | heavy rain overnight in mumbai and pune

हे देखील वाचा :

Cabinet Expansion | शिंदे आणि फडणवीसांच्या सरकारमध्ये कुणाचा वरचष्मा? कोणत्या अपक्ष आमदारांना लागणार मंत्रीपदाची लॉटरी; जाणून घ्या

Pune PMC Water Supply | पुणेकरांना दिलासा ! बकरी ईद व आषाढी एकादशीमुळे पुण्यातील पाणी कपातीच्या वेळापत्रकात बदल

जाणून घ्या SBI Zero Balance सेव्हिंग अकाउंटचे फायदे

Related Posts