IMPIMP

Maharashtra Rain Update | राज्यात विविध भागात पावसाची रिपरिप सुरूच; अनेक जिल्ह्यांना IMD चा ‘अलर्ट’

by nagesh
Rain in Maharashtra | maharashtra rain update heavy rain in maharashtra mumbai pune

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Rain Update | राज्यात पाऊस सक्रिय झाला आहे. अनेक जिल्ह्यांना पावसाने चांगलेच झोडपून (Maharashtra Rain Update) काढले आहे. मुंबईसह (Mumbai), ठाणे (Thane), पालघर (Palghar), रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindhudurg), पुणे (Pune), सातारा (Satara), कोल्हापुरात (Kolhapur) जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. त्याचबरोबर मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भातील (Vidarbha) काही जिल्ह्यात देखील पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पुढील तीन ते चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department-IMD) वर्तवला आहे.

गेल्या चार ते पाच दिवस झाले राज्यात पावसाची रिपरिप दिसून येत आहे. सततच्या जोरदार पावसाने शहरातील रस्ते जलमय झाले आहेत. अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळला असल्याचं पाहायला मिळालं. तसेच, रत्नागिरी जिल्ह्यात 8 जुलै ते 12 जुलै या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. (Maharashtra Rain Update)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हिंगोली जिल्ह्यातील कृष्णा भागामध्ये पावसाने हाहाकार उडाला आहे. ढगफुटी सदृश्य पाऊस पडला आहे. रात्रभर झालेल्या पावसाने गावाजवळ असलेल्या आसना नदीला पूर आला आहे. हे पाणी नदी पात्रातून थेट गावात शिरले आहे. गावातील सर्वच घरात हे पाणी शिरल्याने घरातील संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालं आहे.

दरम्यान, राज्यात आगामी चार ते पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूरात रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे.
मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. विदर्भात देखील चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Web Title :- Maharashtra Rain Update | maharashtra mumbai rain live updates 9 july 2022 rains in mumbai thane satara kolhapur konkan pune nashik aurangabad

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पोलिसांना आदेश; म्हणाले – ‘माझ्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको’

Uday Samant | उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले – ‘देवेंद्र फडणवीसांसोबतच्या बैठकीतच ठरलं’

Pune PMC News | माननीयांच्या ताब्यात असलेला महापालिकेचा योगा हॉल त्रयस्थ संस्थेला परस्पर भाड्याने दिल्याचा प्रकार उघडकीस; मनपाने वास्तुला ठोकले टाळे

Related Posts