IMPIMP

Maharashtra Rains | राज्यात पुढील 3 दिवसांत ‘या’ 8 जिल्ह्यांत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस, IDM चा अंदाज

by nagesh
Maharashtra Rains | light rainfall possibilities in kokan and central maharashtra for next 3 days weather in pune and mumbai

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन दक्षिण पूर्व अरबी समुद्र, लक्षद्वीप (Lakshadweep) मालदीव जवळ (Maldives) चक्रीवादळाच्या पट्ट्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. या द्रोणीय भागामुळे महाराष्ट्रात पावसाची (Maharashtra Rains) स्थिती निर्माण झाली आहे. येत्या 24 तासांत दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, लक्षद्वीप मध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. परिणामी पुढील तीन दिवस राज्यांत मेघगर्जनेसह पावसाची (Maharashtra Rains) शक्यता हवामान खात्याने (IMD) मंगळवारी (30 नोव्हेंबर) वर्तवली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस राज्याच्या अनेक भागांत जोरदार वाऱ्यांसह पावसाची (Heavy rain) शक्यता आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र (Low pressure area) निर्माण होऊन 48 तासात याची तिव्रता वाढणार आहे. यामुळे पालघर, धुळे, नाशिक, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, बीड, जालना अशा विविध ठिकाणी तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे.

कमाल तापमानात घट

राज्यात मंगळवारी दिवसभरात कमाल तापमानात (temperature) घट नोंदवण्यात आली असून कोणत्याही भागात पाऊस (Maharashtra Rains) झालेला नाही. अनेक ठिकाणी ढगाळ हवामान होते. राज्यात सर्वाधिक 34.5 अंश सेल्सिअस तापमान रत्नागिरी येथे नोंदवण्यात आले. तर सर्वात कमी 10.9 अंश सेल्सिअस तापमान गोंदियात नोंदवण्यात आले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

वेगवान वारे वाहण्याची शक्यता

उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) वादळी हवामानासह वाऱ्याचा वेग 45-55 किमीवरुन ताशी 65 किमी पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दक्षिण महाराष्ट्र-गोवा किनाऱ्यावर वादळी हवामानासह वाऱ्याचा वेग ताशी 40-45 किमी प्रतितास जाण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

हे देखील वाचा :

ST Workers Strike | एसटी संप चिघळण्याची शक्यता, पुणे, जळगावमध्ये घडला धक्कादायक प्रकार

Sangli Crime | दुर्देवी ! भरधाव ट्रॅक्टरनं चिमुकलीला चिरडलं

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार ! स्वच्छतागृहात जायच्या आधी महिलांना लिहावा लागायचा अर्ज; ‘या’ कंपनीतील प्रकाराचा ‘मनसे’कडून ‘पर्दाफाश’

Related Posts