IMPIMP

Maharashtra Rains Update | राज्यात सर्वत्र ‘धो-धो’; अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत

by nagesh
Rain in Maharashtra | weather updates in maharashtra mumbai pune konkan vidarbha imd alert heavy rain

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Rains Update | मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने (Maharashtra Rains Update) चांगलीच हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाली असून अनेक भागातील घरात पाणी शिरले आहे. पावसामुळे नद्या, धरणे दुथडी भरुन वाहत आहेत. काही भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. तर काही ठिकाणी पावसाची रिपरिप कायम असल्याचं दिसत आहे. पावसामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झालं आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरुच आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची संततधार सुरु आहे. गडचिरोली, भंडारा, पालघर, चंद्रपूर, गोंदिया, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुण्यासह मुंबईतही जोरदार पाऊस सुरु आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पूर आल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच शेतीला देखील मोठा फटका बसला आहे. विदर्भातील चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यात गंभीर स्थिती पाहायला मिळत आहे. (Maharashtra Rains Update)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, मागील काही दिवस सतत पडणाऱ्या पावसापासून आगामी काही दिवस उसंत मिळण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department-IMD) राज्यातील बहुतेक जिल्ह्यांना येलो (Yellow Alert) देण्यात आला आहे.
तसेच, राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कमी असणार असल्याचे हवामान खात्याने सांगितलं आहे.

Web Title :- Maharashtra Rains Update | maharashtra rains heavy rain at various places in the state

हे देखील वाचा :

Poona Hospital And Research Centre | पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर व जिन कुशल सेवा मंडळाकडून आयोजित रक्तदान शिबीरात 97 रक्तदात्यांनी केले रक्तदान

MP Supriya Sule | राज ठाकरे-फडणवीस भेटीवर सुप्रिया सुळेंचा टोला; म्हणाल्या – एक आमदार असणार्‍याकडे 105 आमदार असणारा…

Raja Mane | राजा माने यांना “सुधारककार” आगरकर राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

Related Posts