IMPIMP

Maharashtra Rains | राज्यात जोरदार पावसाची शक्यता ! आजपासून 3 ऑक्टोबरपर्यंत ‘या’ 6 राज्यांमध्ये होणार जोरदार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

by nagesh
Maharashtra Rains | light to moderate rainfall and cloudy weather possible in konkan and central maharastra on weekend

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Maharashtra Rains | मान्सून (monsoon) आता आपल्या शेवटच्या टप्प्यात आहे. परंतु मान्सून जाता-जाता सुद्धा देशातील अनेक भागात सातत्याने कोसळत आहे. बंगालच्या खाडीत आलेले गुलाब चक्रीवादळ (Gulab Cyclone) कमजोर पडल्यानंतर आता त्याचा परिणाम पश्चिम बंगाल, ओडिसा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र (Maharashtra Rains), गुजरातसह अनेक राज्यात दिसून येत आहे. या राज्यांमध्ये मागील दोन-तीन दिवसांपासून सतत पाऊस होत आहे. मुंबईत सुद्धा पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, आज म्हणजे 30 सप्टेंबर पासून 3 ऑक्टोबरपर्यंत देशातील अनेक राज्यात सामान्य आणि मध्यमसह जोरदार पाऊस (heavy rain) होण्याची शक्यता आहे. दिल्ली, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र (Maharashtra Rains), तमिळनाडु, गुजरात आणि बिहार (Delhi, West Bengal, Maharashtra, Tamil Nadu, Gujarat and Bihar) मध्ये आजपासून चार दिवसापर्यंत पावसाची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र, कोकणात जोरदार पाऊस (Heavy rains in Central Maharashtra, Konkan)

भारतीय हवामान शास्त्र विभागानुसार (आयएमडी) बंगालच्या खाडीत तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे दक्षिणी पश्चिम बंगालमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो.
हवामान विभागानुसार, मध्य महाराष्ट्र, कोकणात जोरदार पाऊस होऊ शकतो.
पुढील दोन दिवसात गुजरात, उत्तर कोकण, उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

स्कायमेटनुसार, महाराष्ट्र, दक्षिण गुजरात, किनारी कर्नाटकचा काही भाग, केरळ, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार द्वीप समूह, किनारी ओडिसा आणि पश्चिम बंगालमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो.
तर बिहार, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश, झारखंड, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, राजस्थान आणि पूर्वोत्तर भारतात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.

Web Title : Maharashtra Rains | weather forecast monsoon update 30th september 2021 weather conditions heavy rain alert these states

हे देखील वाचा :

Earn Money | 1 रुपयाची ही नोट तुम्हाला मिळवून देऊ शकते 45,000 रुपयांपर्यंत मोठी कमाई, जाणून घ्या कशी?

Pune Metro | पद्मावती ते कात्रज दरम्यान मेट्रो स्टेशन करण्याची राष्ट्रवादीची मागणी

Pune Court | डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींविरोधात 13 पुरावे न्यायालयात सादर; आरोपींच्या वकिलांनी केली ‘ही’ मागणी

Related Posts